Header AD

भिवंडी बस आगाराच्या दुरावस्थेकडे आमदार रईस शेख यांनी वेधले लक्ष

भिवंडी , प्रतिनिधी   :  भिवंडी बस आगारात खड्डे व धुळीचे पसरलेले साम्राज्य , बस फेऱ्यांच्या कमतरतेमुळे नागरिकांसह प्रवाशांना होणार त्रास , आगार कार्यालयाच्या इमारतीची दुरुस्ती , शौचाल व अल्पोपहारगृहाची झालेली दुरावस्था , प्रवाशांसाठी शुद्ध पिण्याच्या पाण्याची असलेली वाणवा , जुनाट बस गाड्या तसेच बस फेऱ्यांचे नियोजन अशा विविध मुद्यांवर भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख यांनी आगार व्यवस्थापकांसह आगार व बस परिवहनाच्या अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले . भिवंडी बस आगार येथे बुधवारी आमदार रईस शेख यांनी भेट देऊन झालेल्या बैठकीत परिवहनाच्या अधिकाऱ्यांचे आगारातील समस्यांकडे लक्ष वेधले. या बैठकीप्रसंगी परिवहन महामंडळाच्या स्थापत्य विभागाचे जनरल मॅनेजर कलगी , कार्यकारी अभियंत्या विद्या भिलारकर , ठाणे विभाग नियंत्रक विनोदकुमार भालेराव , विभागीय वाहतूक अधिकारी बांदल तसेच भिवंडी बस आगाराचे व्यवस्थापक शिरीष डुंबरे आदी अधिकारी उपस्थित होते. 


भिवंडी शहराच्या मध्यभागी असलेल्या भिवंडी आगारात बस फेऱ्यांचे योग्य नियोजन नसल्याने नागरिकांना प्रवासात अनेक अडचणी येत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी अनेक वेळा आमदार रईस शेख यांच्याकडे येत होत्या या तक्रारींची दखल घेत आमदार शेख यांनी बुधवारी बस आगारास भेट देऊन येथील प्रवाशांच्या तक्रारी व अधिकाऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या . यावेळी जुन्या झालेल्या बस बदलून नव्या बस गाड्या भिवंडी पगारासाठी देण्यात याव्या अशी मागणी त्यांनी परिवहनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली असून तशी लेखी मागणी आपण परिवहन मंत्र्यांकडे देखील केली असल्याची बाब यावेळी आमदार शेख यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनात आणून दिली. त्याचबरोबर भिवंडी शहरातुन गोदाम पात्यासाठी बस फेऱ्या वाढवाव्यात व भिवंडी ठाणे , नवी मुंबई , भिवंडी ते मुंबई मंत्रालय तसेच भिवंडी ते पश्चिम मुंबई बस फेऱ्या नव्याने सुरु करण्याबरोबरच असलेल्या फेऱ्या वाढविण्याची विनंती देखील त्यांनी या बैठकीप्रसंगी परिवहन अधिकाऱ्यांना केली आहे.


दरम्यान आर्थिक निधी अभावी भिवंडी बस आगाराची दुरावस्था झाल्याची बाब परिवहन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबरच बस आगार व्यवस्थापकांनी आमदार रईस शेख यांच्या निदर्शनात आणून दिली असता आमदार रईस शेख यांनी ठाणे डिव्हिजनच्या फंडातून १२ लाख रुपये तात्काळ मंजूर करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या असून बस आगारात एहतेसाहेब फाउंडेशन मार्फत शुद्ध व दर्जेदार पिण्याच्या पाण्याची मोफत सोया केली जाईल असे आश्वासन यावेळी आमदार शेख यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले असून परिवहन मंत्रालयाकडून लवकरात लवकर आर्थिक निधी मंजूर करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन संबंधित अधिकाऱ्यांना आमदार रईस शेख यांनी याप्रसंगी दिले .
भिवंडी बस आगाराच्या दुरावस्थेकडे आमदार रईस शेख यांनी वेधले लक्ष भिवंडी बस आगाराच्या दुरावस्थेकडे आमदार रईस शेख यांनी वेधले लक्ष Reviewed by News1 Marathi on December 09, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

मुख्य अग्निशमन अधिकारी दिलीप गुंड यांच्या ध्येयपूर्ती पुस्तकाचे आयुक्तांच्या हस्ते प्रकाशन

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :   दिलीप  गुंड यांचे "ध्येयपूर्ती" हे पुस्तक ग्रामीण भागातील प्रत्येक तरुणाला आशादायी व प्रेरणादायी असे...

Post AD

home ads