Header AD

लोकशाही नांदणार्‍या घरात जन्म घेणारे व्यक्तीमत्व म्हणजे शरद पवार मा. ना. डॉ. जितेंद्र आव्हाड


■देशाला सामाजिक सलोखा साहेबांनीच शिकवला ठाण्यात 134 युनिट रक्तसंकलन  सफाई कामगार कोविड योद्धा पुरस्काराने सन्मानित...


ठाणे  , प्रतिनिधी   :  शरद पवारसाहेब यांचे कुटुंब कधीच काँग्रेसची नव्हते. त्यांच्या कुटुंबाची नाळ शेकापक्षाशी जोडलेली होती. मात्र, त्यांचा जन्म लोकशाही नांदणार्‍या घरात झाला. म्हणूनच ते लोकशाहीसाठी झगडणार्‍या काँग्रेसीविचारधारेचे झाले: किंबहुना, या देशाला सामाजिक सलोखाही पवारसाहेबांनीच शिकवला, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना शुभेच्छा दिल्या. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसने ठाण्यात आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरामध्ये सुमारे 134 जणांनी रक्तदान केले. तर, ठामपाच्या सफाई कामगारांना यावेळी कोविड योद्धा या पुरस्काराने गौरविण्यात आले.


कोरोनाच्या पार्श्वभुमीवर वाढदिवसाच्या निमित्ताने मा. शरदचंद्र पवार साहेब हे थेट नागरिकांना भेटणार नसल्याने पक्षाच्या वतीने व्हर्च्युअल अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंचावर शरद पवार, अजितदादा पवार, प्रांताध्यक्ष जयंत पाटील, खा. सुप्रिया सुळे आदी उपस्थित होते.या सोहळ्यात सुमारे 358 तालुक्यांमधील सुमारे 4 लाख कार्यकर्ते सहभागी झाले होते. ठाणे शहरात गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाडसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली गडकरी रंगायतन येथे या व्हर्च्युअल अभिष्टचिंतनाचा सोहळा आयोजित करण्यात आला होता. यासोहळ्याच्या निमित्ताने 7 विभागीय नेत्यांनी शरद पवार यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी डॉ. आव्हाड यांनी अत्यंत ओघवत्या शैलीमध्ये शरद पवार यांच्या कार्याचा गौरव करताना स्वत:ला शरद पवार यांचा परिसस्पर्श लाभल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
डॉ. आव्हाड म्हणाले की,  शेकाप पक्षाच्या विचारधारा असलेल्या कुटुंबात जन्माला आलेल्या शरद पवार यांनी काँग्रेसची विचारधारा स्वीकाल्यानंतर यशवंतराव चव्हाण यांनी त्यांना आपले मानसपुत्र मानले. चव्हाण आणि शरद पवार यांच्यामध्ये अनेकवेळा संघर्षही झाला होता. मात्र, हा संघर्ष प्रेमाचा होता.  आज देशात चीनविरोधात आवाज बुलंद केला जात आहे. पण, 1962 साली जेव्हा भारत-चीन युद्ध झाले. त्यावेळी पुण्यात चीनविरोधात मोर्चा काढणारे शरद पवार हेच होते. पुडे हेच शरद पवार देशाचे संरक्षणमंत्री झाले. शरद पवार हे केवळ राजकीय व्यक्तीमत्व नाही. तर, ते बहआयामी व्यक्तीमत्व आहे. अर्थ, कला, क्रिडा अशा अनेक क्षेत्राचा अभ्यास असलेले देशातील ते एकमेव व्यक्तीमत्व आहे. म्हणूनच 1990-91 ला डावोस येथील भाषण ऐकल्यानंतर प्रख्यात अर्थतज्ज्ञ आणि तत्कालीन अर्थमंत्री डॉ. मनमोहन सिंग यांनी, “ पवारांचे भाषण ऐकल्यानंतर अर्थशास्त्राच्या मार्गदर्शकाचे भाषण ऐकल्यासारखे वाटते” अशा शब्दात गौरव केला होता. मुंबई बॉम्बस्फोटानंतर अवघ्या 48 तासात मुंबईचे शेअर मार्केट याच अर्थशास्त्रज्ञाने सुरु करुन कोट्यवधींचे नुकसा रोखले होते.शरद पवार यांनी राजकारणासह सव चि क्षेत्रात उत्तुंग काम केले आहे. जब्बार पटेल, विजय तेंडुलकर, नामदेव ढसाळ, अमरशेख यांना सढळ हस्ते मदत केली. तमासगिरांच्या पोटापाण्याची व्यवस्था लावणारे ते एकमेव नेते आहेत.
किल्लारीचा भूकंप त्यांना झोपेत असतानाच कळला होता. त्यावेळी त्यांनी केलेले काम हे मैलाचा दगड ठरला आहे. पण, त्यांना भूगर्भात झालेली हालचाल समजली; यावरुन त्यांच्यातील दैवी ताकदीची कल्पना येते. राजकारणात सुुसंस्कृतपणा कसा असतो, हे पवारसाहेबांकडे बघूनच ध्यानात येतो. ज्या लोकांनी साहेबांवर टीका केली. त्याच लोकांना सोबत घेऊन त्यांनी लोकांचे प्रश्न सोडविले आहेत. 

याचे उदाहरण म्हणजे गोपिनाथ मुंडे! त्यांनी केलेली टीका विसरुन ऊस तोड कामगारांसाठी त्यांच्यासोबत काम करणारे पवारसाहेबच होते.  जेव्हा जेव्हा देश संकटात असतो; तेव्हा तेव्हा महाराष्ट्र धावून जात असतो. ही महाराष्ट्राची शिकवण पवारसाहेबांच्या रक्तातील बिंदू-बिंदूपर्यंत पोहचली आहे. म्हणून पंजाबमधील हिंसाचार रोखण्याची जबाबदारी राजीव गांधी यांनी पवारसाहेबांवरच टाकली होती.उत्तराखंडमध्ये पुरानंतर बदलेले शेतीचे नकाशे सुस्थितीत करण्यासाठी केंद्रीय नेतृत्वाने पवारांनाच बोलावले होते. आज जी मनरेगा दिसत आहे ना, तिचा आराखडा वि.स. पागे यांनी तयार केला होता. मात्र, ती कृती पवारसाहेबांनीच आणली होती. शेवग्याच्या शेतीबद्दलची अंधश्रद्धा दूर करुन शेवग्याच्या शेंगांची शेती करण्यास प्रवृत्त करणारे पुरोगामी नेतृत्व म्हणजे शरद पवार हेच होते, अशा शब्दात डॉ. आव्हाड यांनी शरद पवार यांना शुभेच्छा दिल्या.दरम्यान, याच कार्यक्रमात ठाण्याच्या गडकरी रंगायतनमध्ये ठामपाच्या शंकर दाडगे, धनाजी जेठवा, रामचंद्र शिंदे, शिवबाई बेंद्रे, कांचन कारंडे या पाच सफाई कामगारांना प्रातिनिधीक स्वरुपात कोविड योद्धा या पुरस्काराने डॉ. आव्हाड यांच्या हस्ते गौरविण्यात आले. तर, इतर सफाई कामगारांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी सन्मानित करण्यात येणार आहे. ठाण्यातील या कार्यक्रमाचे नियोजन शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी केले होते. तर, यावेळी मंचावर विरोधी पक्षनेत्या प्रमिलाताई केणी, प्रदेश सरचिटणीस तथा गटनेते नजीब मुल्ला, मा. विरोधी पक्षनेते मिलींद पाटील, मा. विरोधी पक्षनेते हणमंत जगदाळे, ठाणे शहर महिलाध्यक्षा सुजाताताई घाग,  ठाणे शहर युवती अध्यक्षा पल्लवी जगताप, विद्यार्थी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रफुल्ल कांबळे हे उपस्थित होते. तसेच, या ठिकाणी युवाध्यक्ष विक्रम खामकर यांनी रक्तदान शिबिराचेही आयोजन केले  होते. या ठिकाणी सुमारे 134 जणांनी रक्तदान केले. रक्तसंकलनासाठी ब्लड लाईन या रक्तपेढीची सर्व टीम उपस्थित होती.  या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे सर्व नगरसेवक, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे  सर्व पदाधिकारी, विधानसभाध्यक्ष, सर्व फ्रंटलचे अध्यक्ष,  ब्लॉक अध्यक्ष, प्रभाग अध्यक्ष यांनी परिश्रम घेतले.
लोकशाही नांदणार्‍या घरात जन्म घेणारे व्यक्तीमत्व म्हणजे शरद पवार मा. ना. डॉ. जितेंद्र आव्हाड लोकशाही नांदणार्‍या घरात जन्म घेणारे व्यक्तीमत्व म्हणजे शरद पवार  मा. ना. डॉ. जितेंद्र आव्हाड Reviewed by News1 Marathi on December 12, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

ठाण्यातील लॉज व हॉटेलच्या अनधिकृत बांधकामांवर महापालिकेची धडक कारवाई

■अनधिकृत बांधकामावर करण्यात आलेल्या कारवाईची छायाचित्रे... ठाणे , प्रतिनिधी  :    ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या आदेशांन्वये ...

Post AD

home ads