पालघर जिल्हा अधिकाऱ्यां कडे सोपवले बोगस शेतकरी दाखल प्रकरण ठाणे जिल्हाधिकाऱ्यां कडून काढून घेतली चौकशी
कल्याण , कुणाल म्हात्रे : कल्याण ग्रामीनच्या कांबा, वाघेरे पाडा , वरप गाव परिसरातील आदिवासी गरीब शेतकऱ्यांची जमीन हडप करण्याच्या प्रकरणाची चौकशी ही आता ठाणे जिल्ह्याधिकाऱ्यांकडून काढून पालघर जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आले आहे. गरीब आदीवासी शेतकऱ्यांची जमीन बोगस शेतकरी दाखले जोडून हडप करण्यात आली होती. आता या प्रकरणात आरोपीना संरक्षण देणाऱ्या प्रांत अधिकारी आणि तहसीलदारांवर कारवाई होईल असे समजले जात आहे.
या प्रकरणात पीडित आदिवासी शेतकऱ्यांच्या बाजूने लढणारे परहीत चॅरिटेबल सोसायटीचे अध्यक्ष विशाल गुप्ता यांच्या द्वारे बोगस शेतकरी दाखल्या बाबत अनेक वेळा सर्व दस्तावेज पुराव्या सह देऊन प्रशासनास सूचना देऊनही स्थानिक तहसील व प्रांत आणि जिल्हा प्रशासनास राष्ट्रीय अनुसूचित जाती जमाती आयोग व राज्य सरकारने संबंधित विभागास चुकीचा रिपोर्ट देऊन दिशाभूल करण्यात आली होती. विधानसभा अधिवेशनात देखील या प्रकरणात चुकीचे रिपोर्ट देण्यात आले होते.
या प्रकरणात आदिवासींच्या बाजूने पाठपुरावा करणारे विशाल कुमार गुप्ता यांच्या द्वारे दिले गेलेले राष्ट्रीय अनुसूचित जाती जमाती आयोग व राज्य सरकारच्या विभागाद्वारे महसूल विभागला सूचना देण्यात आल्या. यानंतर हरकतीत आलेल्या महसूल विभागाच्या कोकण आयुक्तांनी कारवाई करीत या आदिवासींच्या जमिनी हडपण्याच्या या प्रकरणात ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना हटवून हे प्रकरण पालघर जिल्हाधिकाऱ्यांना चौकशी साठी सोपविण्यात आले आहे.
राजस्थानच्या जिल्हा सीरोही तालुका शिवगंज गाव मनादरच्या स्थानिक प्रशासनाने आपल्या रिपोर्ट मध्ये स्पष्ट केले आहे की प्रकाश रेवाचंद बुधराणी हा येथील रहिवासी नाही आणि शेतकरीही नाही. बोगस शेतकरी दाखलाच्या आधारे गरीब आदीवासींची जमीन हडपण्याच्या या प्रकरणात मुख्य आरोपी प्रकाश रेवाचंद बुधराणी व त्यांचे कुटूंबीय निशा, गिरीश, विशाल आणि शीतलच्या विरोधात कल्याण तालुका पोलीस स्थानकात वेगळे वेगळे दोन प्रकरणेपण दाखल आहेत. या भूमाफियांना झुकते माप देणाऱ्यांकडून हे प्रकरण काढून ते पालघर जिल्हाधिकाऱ्या कडे सोपविण्यात आले आहे.या कारवाई मुळे गरीब आदिवासींना न्याय मिळन्याची आशा निर्माण झाल्याचे दिसून आहे. आता पालघर जिल्हाधिकारी या प्रकारणाला कश्या प्रकारे न्याय देतात हे पाहावे लागेल.

Post a Comment