Header AD

ऑक्सिजन वाहिनी उंबार्ली टेकडी अतिक्रमणांच्या विळख्यात

 

■पर्यावरणाचा ऱ्हास थांबविण्यासाठी दोषींवर कठोर कारवाई करावी  आमदार राजू पाटील....


कल्याण, कुणाल  म्हात्रे  :  डोंबिवली परिसरामधील मौजे धामटणदावडीउंबार्लीहेदुटणे भागात महाराष्ट्र वनविभागाच्या अखत्यारीतील वन आहे. त्यापैकी उंबार्ली  पक्षी अभयारण्य म्हणून ओळखले जाते. येथे खाजगी संस्थाकडून वृक्षरोपण मोहीम राबविण्यात येते. मनसेचे आमदार राजू पाटील यांनी पर्यावरण प्रेमींसोबत पर्यावरणास होत असलेल्या अडचणी आणि समस्यांची माहिती घेतली आहे.


उंबार्लीहेदुटनेदावडी या परिसरात विविध पक्षीकिटकफुलपाखरेसापसरपटणारे प्राणी आणि विविध प्रकारची वृक्षसंपदा आहे. हा परिसर डोंबिवली शहराचा फुप्फुस असून ऑक्सिजन झोन म्हणून ओळखला जातोयाच जंगलावर सध्या माफियांची सध्या नजर पडली आहे. बाजूलाच उंबार्ली येथे  गृहनिर्माण प्रकल्पाच्या नावावर जंगलाचा ऱ्हास सुरु आहे.  मोठमोठे क्रशर व मशिनरी लावून खोदकाम सुरु आहे.  तसेच  दरवर्षी या जंगलाला आगी लावण्यात येतात. काहीवेळा डोंगरावर रासायनिक पदार्थ टाकून निसर्गाची हानी करण्याचा प्रयत्न सुरु आहे.


मुंबईसाठी 'आरेजंगलाचे जेवढे महत्व आहे. तेवढेच कल्याण डोंबिवलीसाठी 'उंबार्लीआणि परिसराचे आहे. जंगलाचे अस्तिव टिकवायचे असेल  तर पर्यावरण पुरक प्रयत्न  करायला हवेत. यासाठी येथील पर्यावरणासाठी धोकादायक ठरणाऱ्या बाबींची चौकशी करण्याबाबत मनसे आमदार राजू पाटील यांनी पर्यावरण मंत्री व वनमंत्री यांना पत्र  देऊन कठोर  कारवाई करण्याची मागणी केली आहे.


त्याच बरोबर या जंगलाचे योग्य संवर्धन करायचे असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची नाशिक महानगरपालिका  सत्ता असताना पांडवलेण्याचा पायथ्याशी असलेल्या पंडित जवाहलाल नेहरू वनोद्यान टाटा ट्रस्टच्या वतीने विकसित केले आहे. आज हे गार्डन पाहण्यासाठी देशभरातून पर्यटक येतात आणि दरवर्षी लाखो रुपयांचे उत्पन्न महानगरपालिकेला मिळते. त्याच धर्तीवर निसर्गसंपदेने नटलेल्या मौजे धामटण  येथे  बोटॅनिकल गार्डन बनविण्याची परवानगी द्यावी अशी मागणी मनसेचे आमदार राजू पाटील यांनी वनमंत्र्याकडे केली. 

ऑक्सिजन वाहिनी उंबार्ली टेकडी अतिक्रमणांच्या विळख्यात ऑक्सिजन वाहिनी उंबार्ली टेकडी अतिक्रमणांच्या विळख्यात Reviewed by News1 Marathi on December 01, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

मागासवर्गीयांच्या पदोन्नती मधील आरक्षणा साठी राज्य पालांनी हस्तक्षेत करावा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

■ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाच्या  शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट मुंबई दि...

Post AD

home ads