भिवंडी शहरातील वाहतूक सुधारणा करणे कामी प्रभावी उपाययोजना राबविणार आयुक्त डॉ. पंकज आशिया
भिवंडी, प्रतिनिधी : भिवंडी शहरातील वाहतूक समस्या,वाहतूक कोंडी याच्या तक्रारी वाढत आहेत. शहरातील अंतर्गत रस्ते लहान असल्याने तीन बत्ती, कासार आळी,झेंडा नाका, निजामपुरा,शांती नगर नारपोली, कामतघर या सर्व भागात सर्वत्र रस्ते लहान असल्याने रस्त्यावर वाहतूक खोळंबा होत आहेत. याबाबत वारंवार तक्रारी येत आहेत, तसेच वाहतूक खोळंबा होत असल्याने नागरिकांना त्याचा त्रास होत आहे.
ही बाब लक्षात घेऊन नागरिकांना चांगल्या वाहतूक सोयी देणेकरिता शहरातील वाहतूक व्यवस्थापन रस्ते सुरक्षा सुधारणा उपाय योजना करणेकामी आयुक्त डॉक्टर पंकज आश्यिया यांनी सर्व संबंधित विभागाची बैठक बोलावली होती. या बैठकीला ठाणे वाहतूक पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील, भिवंडी परिमंडळ 2 चे पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी व्ही.एन. शिंदे, मनपा सहाय्यक नगररचनाकर प्रल्हाद होगे पाटील, शहर अभियंता लक्ष्मण गायकवाड, नगररचनाकार श्रीकांत देव, भिवंडी वाहतूक पोलीस निरीक्षक पी.आय.मायने तसेच वाहतूक पोलिस अधिकारी व मनपा अधिकारी उपस्थित होते.
शहरातील अरुंद रस्ते मुख्य, रस्त्यावर होणारी वाहतुकीची कोंडी याबाबत बैठकीत सविस्तर आढावा घेण्यात आला. या कामी तातडीने कोणत्या उपाययोजना करता येतील याबाबत भिवंडी वाहतूक पोलीस, भिवंडी पोलीस विभाग व महानगरपालिका शहर अभियंता, यांची एक संयुक्त समिती स्थापन करून ज्या काही उपाययोजना तातडीने करणे करणे शक्य आहे त्याच्या त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याच्या सूचना आयुक्त डॉक्टर पंकज यांनी संबंधित विभागाला दिल्या आहेत.
यामध्ये मुख्य राष्ट्रीय महामार्ग अंजुर फाटा ते वंजार पट्टि नाका या रस्त्यावरील फुटपाथवरील अतिक्रमण हटवणे, या रस्तावरील नादुरूस्त बेवारस गाड्या हटविणे, या रस्त्यावर पार्किंग,नोपार्किंग बोर्ड लावणे, मुख्य रस्त्यावर सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करणे, शहरातील तीन बत्ती,बाजार पेठ भाजी मार्केट, मंडई, या भागातील वाहनांकरिता तातडीने मार्केट आरक्षित भूखंड क्रमांक 54 येथे तात्पुरत्या पार्किंगची व्यवस्था करणे, शहरातील मुख्य मुख्य वाहतुकीचे रस्ते अरुंद रस्ते जे आहेत ते शहर विकास नियमावली नियमावलीप्रमाणे रुंद करणे कामी नियोजन करणे, शहरातील पार्किंग सम व विषम तारखेला वाहने उभी करणे, जड अवजड वाहनांना रात्रीच्या वेळेस शहरात प्रवेश देणे, एकेरी मार्गिका तयार करणे,रस्ते दुभाजक निश्चित करणे, काही ठिकाणी वाहनांना प्रवेश बंदी करणे इत्यादी दिशादर्शक नाम फलक लावणे, रस्ते गतिरोधक तयार करणे, झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे मारणे, आणि त्याच बरोबर शहरातील रस्ते दुरुस्तीची कामे अपूर्ण आहे ती तातडीने पूर्ण करणे इत्यादी सूचना आयुक्त डॉक्टर पंकज आशिया यांनी सर्व संबंधित विभागाला दिल्या आहेत.
भिवंडी शहरातील वाहतूक सुधारणा करणे कामी प्रभावी उपाययोजना राबविणार आयुक्त डॉ. पंकज आशिया
Reviewed by News1 Marathi
on
December 10, 2020
Rating:

Post a Comment