७३व्या व्हर्च्युअल वार्षिक निरंकारी संत समागमाची जय्यत पूर्वतयारी मानवतेचा कुंभमेळा संत निरंकारी समागम
कल्याण, कुणाल म्हात्रे : मागील ७२ वर्षांची परंपरा कायम ठेवत ’७३ वा वार्षिक निरंकारी संत समागम’ यावर्षी जगाची वर्तमान परिस्थिति लक्षात घेऊन व्हर्च्युअल रुपात आयोजित करण्यात येत आहे. ज्याचा शुभारंभ शनिवार दिनांक ५ डिसेंबर रोजी होत आहे. या संत समागमामध्ये देश-विदेशातील अनेक संस्कृती, सभ्यता आणि बहुरंगी छटांचे दर्शन होईल. डोंबिवली, कल्याण, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर भागातील हजारो निरंकारी भक्तगणांसह संपूर्ण देश तसेच जगभरातील निरंकारी भक्तगण आणि प्रभुप्रेमी सज्जन मोठ्या आतुरतेने या संत समागमाची वाट पाहत असून त्यांची प्रतीक्षा आता संपली आहे.
वार्षिक निरंकारी संत समागमाची जय्यत पूर्वतयारी पूर्ण समर्पित भावनेने व सजगतेने सरकारकडून जारी करण्यात आलेल्या निर्देशांचे (जोवर लस नाही, तोवर ढिलाई नाही) पालन करत केली गेली आहे. समागमामध्ये भाग घेतलेल्या भक्तगणांच्या बाबतीत थर्मल स्क्रीनिंग, मास्कचा वापर, सॅनिटायझरचा वापर आणि सोशल डिस्टन्सिंग (दोन फूट अंतर, मास्कचा वापर) या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात आले आहे.यावर्षी समागमाचा मुख्य विषय ‘स्थिरता’ यावर आधारित गीत, विचार, कविता यांचे प्रस्तुतीकरण समागमाच्या माध्यमातून केले जाईल. त्याचे रेकॉर्डिंग ५-५ टीम मेम्बर्सना मिशनच्या दिल्ली मुख्यालयामध्ये बोलावून करण्यात आले आहे. याशिवाय देश-विदेशांत अगोदरच रेकॉर्ड केलेल्या कार्यक्रमांचा समावेश देखिल यामध्ये करण्यात आला आहे ज्याचे प्रसारण व्हर्च्युअल रुपात केले जाईल.
जरी हा संत समागम व्हर्च्युअल रुपात होत असला तरी याला साकार रुप देण्यासाठी मिशनच्या वतीने रात्रंदिवस अथक प्रयास करण्यात आले आहेत जेणेकरुन जेव्हा याचे प्रसारण केले जाईल तेव्हा भक्तगणांना दरवर्षीप्रमाणे आपण प्रत्यक्ष समागमच पाहत आहोत अशी अनुभूती यावी. सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या दिव्य मार्गदर्शनाद्वारेच हे शक्य झाले आहे.समागमाचा प्रारंभ ५ डिसेंबर रोजी सायंकाळी ४.३० वाजता सत्संगाच्या रुपात होईल ज्यामध्ये सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज आपला ‘मानवतेच्या नावे संदेश’ प्रेषित करतील.
त्यानंतर सत्संग कार्यक्रमाच्या शेवटी रात्री ८.३० ते ९.०० वाजेपर्यंत सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज आपल्या दिव्य प्रवचनाद्वारे आपले पावन आशीर्वाद प्रदान करतील. समागमाचे प्रसारण तिन्ही दिवशी मिशनच्या वेबसाईटवर सायंकाळी ४.३० से रात्री ९.०० वाजेपर्यंत तसेच संस्कार टी.व्ही.चॅनलवर सायंकाळी ५.३० ते रात्री ९.०० वाजेपर्यंत प्रसारित करण्यात येईल.समागमाच्या दुसऱ्या दिवशी ६ डिसेंबर रोजी सकाळी ११.३० ते दुपारी १.०० वाजेपर्यंत सेवादल रॅली एका मुख्य आकर्षणाच्या रुपात मिशनच्या वेबसाईटवर आयोजित करण्यात येईल. याशिवाय संस्कार टी.व्ही चॅनलवरही दुपारी १२.०० ते १.०० वाजेपर्यंत या रॅलीचे प्रसारण केले जाईल.

Post a Comment