शनी नगर प्रभागात जेष्ठ नागरिक कट्टा आणि वाचनालयाचे लोकार्पण
■नगरसेवक राजाराम पावशे यांच्या प्रयत्नांना यश आमदार विश्वनाथ भोईर यांच्याहस्ते झाले उद्घाटन...
कल्याण, कुणाल म्हात्रे : कल्याण पूर्वेतील प्रभाग क्रमांक ९७ शनी नगर येथे नगरसेवक राजाराम पावशे यांच्या प्रयत्नाने जेष्ठ नागरीक कट्टा आणि वाचनालयाचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.जेष्ठ नागरीकांना वृत्त पत्र वाचण्यास मिळावे त्याच बरोबर जेष्ठ नागरीक संस्थेला कार्यालय उपलब्ध व्हावे या उद्देशाने काटेमानिवली येथील जुन्या पोस्ट ऑफिस इमारती जवळ बांधण्यात आलेल्या कार्यालय आणि वाचनालयाचे उद्घाटन कल्याण पश्चिम विधानसभा मतदार संघाचे आमदार आणि कल्याण शहर शिवसेना शहर प्रमुख विश्वनाथ भोईर यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले .विश्वभूषण डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिवाण दिनी या उद्घाटन सोहळ्याचे आयोजन करण्यातआले होते.
यावेळी उपस्थितांना संबोधीत करतांना आमदार भोईर यांनी सांगितले की डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या समाजाला शिक्षण आणि वाचनाचा कानमंत्र दिला मानवाला स्वःताची प्रगती करून घ्यायची असेल तर वाचन महत्वाचे आहे. राजाराम पावशे यांनी जेष्ठ नागरीकांसाठी या कार्यालयाच्या आणि वाचनालयाच्या माध्यमातून जेष्ठ नागरीकांबरोबरच परिसरातील नागरीकांना वृत्तपत्र वाचनाची संधी उपलब्ध करून दिली आहे हे फार मोठे समाज कार्य आहे असेही ते म्हणाले.
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या समाजाला अंधत्कारातून उजेडात आणले आहे. त्यांनी अनेक साहित्य निर्माण केले आहे. हे साहित्य केवळ डोक्यावर घेउन नाचण्यात अर्थ नाही तर या साहित्याचे वाचन आणि चिंतन करून ते डोक्यात घेण्याची गरज असल्याचे मत उल्हासनगर महापालिकेतील शिवसेनेचे गटनेते धनंजय बोडारे यांनी व्यक्त केले. तर माजी नगरसेवक शरद पाटील यांनी सांगितले की डॉ बाबासाहेबांनी सांगितले होते की वाचाल तर वाचाल या प्रमाणेच प्रत्येकाने वाचन केले तर आपल्या प्रगतीच्या दिशा नक्कीच उंचावतील.
जुन्या काटेमानिवली पोष्टाच्या जवळ निर्माण करण्यात आलेल्या काटेमानिवली जेष्ठ नागरीक संस्था या संस्थेचे कार्यालय आणि वाचनालयाच्या या उद्घाटन समयी माजी महापौर रमेश जाधव, नगरसेवक महेश गायकवाड, विशाल पावशे, हर्षवर्धन पालांडे, महादेव रायभोळे, नगरसेविका शितल मंढारी, संगिता गायकवाड यांच्यासह कल्याण पूर्वेतील अनेक शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.
Post a Comment