सरकारी योजनाच्या ५ दिवसाचे शिबिराचा ३ हजार पेक्षा नागरिकांनी घेतला लाभ
डोंबिवली , शंकर जाधव : सरकारी योजना नागरिकांसाठी आवश्यक असून सर्व योजनाचा लाभ घेतला पाहिजे.डोंबिवलीत शिवसेना नगरसेवक वामन म्हात्रे यासह गोरखनाथ ( बाळा ) म्हात्रे व अनमोल म्हात्रे यांनी डोंबिवली पश्चिमेकडील गरीबाचा वाडा जवळील अनमोल नगरी येथे सरकारी योजनाच्या ५ दिवसाच्या शिबिरात ३ हजार पेक्षा नागरिकांनी लाभ घेतला. या shibiraatमाजी नगरसेविका कविता म्हात्रे आणि अश्विनी म्हात्रे यांनी उपस्थित नागरिकांना मदत केली.मनोज वैद्य, राजकुमार म्हात्रे,संदीप सामंत,अवि मानकर यासह अनेकांनी शिबिर यशस्वीतेसाठी अथक मेहनत घेतली.
आयुष्यमान भारत योजना, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना,किसान सन्मान निधी योजना,किसान क्रेडिट कार्ड,जन धन योजना या पाच योजनाची माहिती नागरिकांना देत या योजनेत उपस्थित नागरिकांना आवश्यक कागदपत्राची पूर्तता करून सहभागी करून घेतले. आधार कार्ड,७/१२ सातबारा, बँक पासबुक,मोबाईल नंबर अशी कागदपत्रे या योजनांसाठी आवश्यक कागदपत्रे आहेत.
यावेळी गोरखनाथ ( बाळा ) म्हात्रे म्हणाले,सरकारी योजनासर्वांनी सहभागी होणे आवश्यक आहे. या योजना नागरिकांपर्यत पोहचण्याचे काम आम्ही करत आहोत.या शिबिरात सरकारी योजना मोफत देत असून यासाठी या शिबिरात अनेकांनी याचा लाभ घेतला.तर अस्मिता जयस्वाल यांनी सदर योजनांबाबत नागरिकांच्या कागदपत्राची पूर्तता करून या योजनेत सहभागी करण्यास सहकार्य केले.

Post a Comment