Header AD

शिरोळे ग्रामपंचायत उपसरपंच पदी शिवसेनेच्या हरिदिनी मते बिनविरोध

  



भिवंडी ,  प्रतिनिधी   :  भिवंडी तालुक्यातील शिरोळे ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी शिवसेनेच्या हरिदिनी जयदास मते या बिनविरोध निवड करण्यात आली आहे .शिरोळा ग्रामपंचायतीचे उपसरपंच सुनील लोणे यांनी आपापसात ठरल्या प्रमाणे आपल्या पदाचा राजीनामा दिला नंतर या पदासाठी विशेष सभा आयोजित करण्यात आली होती त्या सभेत हरिदिनी मते यांचा एकमेव उमेदवारी अर्ज आल्याने सरपंच पूनम गोडे यांनी त्यांच्या निवडीची घोषणा केली .


शिरोळा ग्रामपंचायती मध्ये श्रमजीवी संघटना व शिवसेना यांची सत्ता असून त्या माध्यमातून गावाच्या विकासा साठी विरोध न करता सर्व सदस्यांनी एकत्रित येऊन काम केल्यास गावाचा विकास जलद गतीने होईल असा विश्वास शुभेच्छा देताना श्रमजिवी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक सापटे यांनी व्यक्त केला .


या विशेष सभेस उपसरपंच सुनील लोणे ,सदस्य चित्रा मते ,शोभा जाधव ,संगीता सवर, संजय मानकर ,अनंता गोड ,कृष्णा शेलार ग्रामसेवक जाधव यांनी नवनिर्वाचित उपसरपंच हरिदिनी मते यांचे स्वागत केले ,त्या नंतर शुभेच्छा देण्यासाठी श्रमजीवी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक सापटे ,ग्रामस्थ हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते .
शिरोळे ग्रामपंचायत उपसरपंच पदी शिवसेनेच्या हरिदिनी मते बिनविरोध शिरोळे ग्रामपंचायत उपसरपंच पदी शिवसेनेच्या हरिदिनी मते बिनविरोध Reviewed by News1 Marathi on December 24, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

मागासवर्गीयांच्या पदोन्नती मधील आरक्षणा साठी राज्य पालांनी हस्तक्षेत करावा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

■ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाच्या  शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट मुंबई दि...

Post AD

home ads