Header AD

भिवंडीत देशी बनावटीचे पिस्तूल व ३ जिवंत काडतुसेसह गुन्हेगारांची दुकली जेरबंद

 

 भिवंडी , प्रतिनिधी :  देशी बनावटीचे पिस्तूल व ३ जिवंत काडतुसेसह गुन्हेरागांच्या  दुकलीला निजामपूरा  पोलिसांच्या पथकाने सापळा रचून जेरबंद केले  आहे.  ही  दुकलीला जेरबंद झाल्याने  त्यांनी रचलेला  गुन्हेगारीतील  मनसुबा पोलिसांनी उधळून लावला आहे.  आता नेमके ही गुन्हेगार दुकली शहरात  देशी बनावटीचे पिस्तूल व ३ जिवंत काडतुसे जवळ बाळगून का ? फिरत होती याचा तपास पोलिसांनी सुरु केला आहे. मोहंमद हनीफ नईमुद्दीन शेख, (वय २९,  रा. नदीनाका, भिवंडी) सैफ एजाज मोमीन, (वय २४, रा.  म्हाडा कॉलनी, भिवंडी ) असे जेरबंद केलेल्या दुकलीचे नाव आहे. 

 

खबऱ्याच्या माहितीमुळे पोलिसांनी उधळला मनसुबा ... 


भिवंडी परिमंडळच्या हद्दीत अवैध्य धंदे व गुन्हयांना आळा घालण्यासाठी  पोलीस उप आयुक्त योगेश चव्हाण यांच्या  आदेश व सुचनांनुसार निजामपुरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विजय डोळस यांचे मार्गदर्शनाखाली निजामपुरा  गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी व अमलदार  गस्त घालून गुन्हेगार वॉच करीत होते.  त्यावेळी गुन्हे प्रकटीकरण पथकातील अंमलदार स. फौ.खान यांना त्यांचे गुप्त बातमीदारामार्फत भिवंडीत पिस्तूलसह काडतूसे घेऊन दोन गुन्हेगार  भिवंडीतील  मिल्लतनगर, परिसरात येत असल्याची माहिती मिळाली होती.


 या माहितीच्या आधारावर निजामपुरा पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी व अमलदार यांनी गुन्हेगारावर पाळत ठेवून  सापळा रचला होता. त्यावेळी  मोहंमद शेख आणि  सैफ मोमीन यांच्या संशयास्पद हालचालीवरून  ताब्यात घेतले. आणि त्यांची   अंगझडती घेतली असता एक स्टिल बॉडीचे  असलेले देशी बनावटीचे मॅगझीन असलेले पिस्टल ३ पितळी घातुची जिवंत काडतुसे,  दोन मोबाईल व  ६६ रू. रोख  असा एकुण ३५ हजार ९६० रुपये  किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

 

 पिस्तूल आणि काडतुसे  कुठून आणि कशासाठी ? 

याप्रकरणी  निजामुपरा पोलीस ठाण्यात  भारतीय हत्यार कायदा कलम ३, २५ सह म.पो.का. कलम ३७(१),(३), १३५ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.  चोऱ्या-घरफोड्या-वाटमाऱ्या-दरोडा, वा कुणाला तरी टपकवण्याचा या दोघा मनसुबा असावा, असा पोलिसांचा कयास आहे. तर  सदर पिस्तूल आणि काडतुसे या दुकलीने कुठून आणि कशासाठी आणली, याचा पोलिस कसोशीने शोध घेत असल्याचे पोलीस उप आयुक्त योगेश चव्हाण  यांनी  सांगितले.


भिवंडीत देशी बनावटीचे पिस्तूल व ३ जिवंत काडतुसेसह गुन्हेगारांची दुकली जेरबंद भिवंडीत देशी बनावटीचे पिस्तूल व ३ जिवंत काडतुसेसह गुन्हेगारांची दुकली जेरबंद  Reviewed by News1 Marathi on December 23, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

टेलगट ट्युमर सारख्या दुर्धर आजाराची शस्त्रक्रिया पहिल्या प्रयत्नात डोंबिवलीत बाज आर आर रुग्णालयात यशस्वी..संपूर्ण देशात या आजाराचे केवळ ५३ रुग्ण

  डोंबिवली ( शंकर जाधव )  जन्माला येतानाच काही जनुकीय रचनांमध्ये बदल झाल्यास भविष्यात  टेलगट ट्युमर नावाचा  दुर्मिळ आजार होण्याची शक्यता असत...

Post AD

home ads