Header AD

कल्याण पूर्वेत शिवसेनेच्या बंदच्या आवाहनाला चांगला प्रतिसाद

 कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ भारत बंदच्या आवहानाला कल्याण पूर्वेत चांगला प्रतिसाद मिळाल्याचे पाहायला मिळाले. शिवसेना कल्याण पूर्व च्या वतीने करण्यात आलेल्या आवाहनानुसार कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी परिसरातील मुख्य बाजारपेठेतील दुकाने व्यापाऱ्यांनी बंद ठेवली होती.


कल्याण पूर्व विधानसभा शिवसेना सहसंपर्कप्रमुख तथा माजी नगरसेवक शरद पाटील यांच्या नेत्तृत्वाखाली शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेना शाखेसमोर निदर्शने करत दुकाने सुरु असलेल्या व्यापाऱ्यांना दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केले. त्यांच्या या आवाहनाला व्यापाऱ्यांनी देखील चांगला प्रतिसाद देत दुकाने बंद केली.


कल्याण पूर्वेत सकाळी ९ वाजेपासून रिक्षा बंद झाल्या आहेत. दुकानदारांनी देखील स्वयंस्फूर्तीने दुकाने बंद केली आहेत. शिवसेनेने ११ ते ३ बंद करण्याचे आवाहन केले होते. त्याला जनतेनेसुद्धा चांगला प्रतिसाद दिला असून केंद्र सरकारने बनवलेल्या कृषी कायद्याला जनता देखील विरोध करत आहे. या कायद्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याने आम्ही त्याचा विरोध करत असल्याची प्रतिक्रिया कल्याण पूर्व विधानसभा शिवसेना सहसंपर्कप्रमुख शरद पाटील यांनी दिली.


सरकारने मंजूर केलेले कृषी विधेयक अन्यायकारक असून यामुळे शेतकरी देशोधडीला लागणार आहे. या कायद्याविरोधात संपूर्ण भारत बंदची हाक देण्यात आली असून जवळपास २० पक्ष यात सहभागी झाले आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील या बंदला पाठींबा दिल्याने त्यानुषंगाने कल्याण पूर्वेत बंद पुकारण्यात आला असून. नागरिक देखील स्वयंस्फूर्तीने या बंद मध्ये सहभागी झाले असून हम करे सो कायदा या केंद्र सरकारच्या धोरणाविरुद्ध नागरिकांनी आवाज उठवला असल्याचे शिवसेना उपशहरप्रमुख तथा माजी नगरसेवक हर्षवर्धन पालांडे यांनी सांगितले.  


       शेतकऱ्यांना भिकेला लावणारा हा कायदा असून, शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे. शिवसेनेच्या या बंदला चांगला प्रतिसाद मिळाला असल्याची प्रतिक्रिया नगरसेवक राजाराम पावशे यांनी दिली. दरम्यान या आंदोलनात शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. या आंदोलनकर्त्यांना कोळसेवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले.

कल्याण पूर्वेत शिवसेनेच्या बंदच्या आवाहनाला चांगला प्रतिसाद कल्याण पूर्वेत शिवसेनेच्या बंदच्या आवाहनाला चांगला प्रतिसाद Reviewed by News1 Marathi on December 08, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

ठाण्यातील लॉज व हॉटेलच्या अनधिकृत बांधकामांवर महापालिकेची धडक कारवाई

■अनधिकृत बांधकामावर करण्यात आलेल्या कारवाईची छायाचित्रे... ठाणे , प्रतिनिधी  :    ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या आदेशांन्वये ...

Post AD

home ads