लसीच्या उत्साहाने कच्चे तेल व धातूच्या दरात सुधारणा
मुंबई, ११ डिसेंबर २०२० : लसीसंबंधी घडामोडींमुळे बाजारातील सकारात्मक भावना वाढल्या. तसेच जागतिक मध्यवर्ती बँकांकडून आणखी आधाराची अपेक्षा असून लोकांना लस विकसित होण्यासंबंधी नियामकांची मंजूरी मिळण्याचीही आशा होती. त्यामुळे गुरुवारी सुरक्षित मालमत्ता असलेल्या सोन्याच्या दरात घसरण झाली तर इतर प्रमुख कमोडिटीजचे दर वाढले असल्याचे एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे गैर कृषी वायदा व चलन संशोधन उपाध्यक्ष श्री प्रथमेश माल्या यांनी सांगितले.
सोने: गुरुवारी, स्पॉट गोल्डचे दर ०.२१ टक्क्यांनी घसरून १८३५.३ डॉलर प्रति औसांवर स्थिरावले. कारण कोव्हिड-१९ लसीच्या आशा वाढल्याने बाजारातील जोखीमीची भूकही वाढली. परिणामी सोन्याचे आकर्षण कमी झाले. काही देशांमध्ये सोन्याच्या तुलनेत अनेक देशांनी जोखीम असलेल्या मालमत्तेत गुंतवणूक केली. लसीला नियामकांची मान्यता आणि चाचण्यांमुळेही या ट्रेंडला आणखी आधार मिळाला. कोव्हिड-१९ च्या रुग्णांमध्ये चिंताजनक वाढ झाल्याने सोन्याच्या दराला काहीसा आधार मिळाला. अमेरिकेत बेरोजगारीच्या नव्या दाव्यांमुळे सोन्याला आणखी आधार मिळाला. वाढत्या संसर्गामुळे सोन्याला आणखी दिलासा मिळू शकतो, परिणामी आर्थिक सुधारणेला मदत होईल.
चांदी: स्पॉट सिल्व्हरच्या दरात फार बदल झाले नाहीत. हे दर ०.१२ ट्क्यांनी वाढून २३.९ डॉलरवर स्थिरावले. एमसीएक्सवरील चांदीच्या दरात हाच ट्रेंड दिसून आला. त्यात ०.०५ टक्क्यांनी वाढ होऊन ६३,५३० रुपये प्रति किलोवर हे दर स्थिरावले.
कच्चे तेल: लसीच्या उत्साहामुळे आर्थिक सुधारणेच्या आशा वाढल्या आणि कच्च्या तेलाची मागणी वाढली. डब्ल्यूटीआय क्रूडचे दर २.८ टक्क्यांनी वाढले व ते ४६.८ डॉलर प्रति बॅरलवर स्थिरावले. अमेरिकी क्रूड साठ्यात अनपेक्षित वाढ झाले तरीही दरांवर त्याचा नकारात्मक परिणाम झाला नाही. एनर्जी इन्फॉर्मेशन अॅडमिनिस्ट्रेशनच्या अहवालांनुसार, अमेरिकी क्रूडसाठ्यात १५.२ दशलक्ष प्रति बॅरल एवढी वाढ झाली. ती १.४ दशलक्ष बॅरलने घटणार असा अंदाज होता.
अमेरिका आणि चीन दरम्यान तणाव वाढल्याचा परिणाही बाजारावर झाला. हाँगकाँग बाबतच्या राजकीय चिंतेमुळे अमेरिका काही चिनी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे काही अहवालांत सांगण्यात आले. ओपेक आणि रशियाने जानेवारी २०२१ पासून पुढे तेलाचे उत्पादन काहीसे वाढवून ते दररोज ५००,००० बॅरल्स एवढे करण्याचे मान्य केले.
बेस मेटल्स: औद्योगिक धातूंची मागणी वाढल्याने एलएमईवरील बेस मेटलचे दर वाढलेले दिसून आले. संभाव्य लसीच्या विकासात सुधारणा झाल्याने हा परिणाम दिसून आला. निकेलचे दरही मागणीत दमदार सुधारणा झाल्याने वाढले. चिनी गोदामांची पातळी खालावल्याने चीनकडून मागणी वाढली तसेच स्टील मिल्सकडूनही मागणी वाढल्याने हे परिणाम दिसून आले.
धातूचा सर्वाधिक वापर करणारा देश चीनने कोव्हिड-१९ नंतर जोरदार सुधारणा दर्शवली. प्रोत्साहनामुळे वाढलेली मागणी आणि तसेच नकारात्मक घटक दूर सारले गेले. त्यामुळे 2020 मधील दुसऱ्या तिमाहीत औद्योगिक धातूंमध्ये दोनअंकी नफा दिसून आला.
तांबे: गुरुवारी एलएमई कॉपरचे दर २ टक्क्यांनी वाढून ७८७८ डॉलर प्रति टनांवर स्थिरावले. कारण लाल धातूच्या मागणीत वाढीच्या आशेने धातूंच्या दरातही वाढ झाली. चिलीतील खाण कामगार अँटोफागस्ताने सेंटिनेला खाणीतील एका संघटनेशी करार यशस्वीपणे केला. दुसऱ्या संघटनेसोबतही वाटाघाटी सुरू आहेत.

Post a Comment