Header AD

लॉकडाऊन नंतर नाटकाच्या पहिल्या प्रयोगासाठी अत्रे रंगमंदिर सज्ज सुरक्षिततेचे नियम पाळून होणार नाट्यप्रयोग
कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  मुंबई ठाण्या पाठोपाठ कल्याण डोंबिवलीतील नाट्यगृह खुली करण्याचा निर्णय पालिका आयुक्तांनी नुकताच घेतला होता. आयुक्तांच्या या निर्णयानंतर लॉकडाऊन नंतर शनिवारी नाटकाचा पहिलाच प्रयोग कल्याण पश्चिमेतील आचार्य अत्रे रंगमंदिर येथे होणार आहे. उद्या होणाऱ्या या पहिल्या नाटकाच्या प्रयोगासाठी अत्रे रंगमंदिर सज्ज असून कोरोना पार्श्वभूमीवर सुरक्षिततेचे सर्व नियम पाळून नाट्यप्रयोग होणार असल्याची माहिती शहर अभियंता सपना कोळी यांनी दिली. कोरोना लोकडाऊन काळात कोरोनाला प्रतिबंध घालण्यासाठी गेल्या ९ महिन्यापासून केडीएमसीचे सावित्रीबाई फुले आणि आचार्य अत्रे नाट्यगृहं बंद होती. त्यापैकी कल्याणातील आचार्य अत्रे रंगमंदिराचा पडदा उद्या पुन्हा उघडणार आहे. 


मुंबई- ठाण्यासह संपूर्ण एमएमआर रिजनमध्ये सुरू होणार आचार्य अत्रे हे पहिलेच रंगमंदिर ठरणार आहे. तर २० डिसेंबरला डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाट्यगृहं पुन्हा नाट्य रसिकांच्या सेवेत रुजू होणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी अत्रे रंगमंदिरातील आसनव्यवस्थेमध्ये बदल करण्यात आले असून, एक खुर्ची सोडून एक अशाप्रकारे बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या शहर अभियंता सपना कोळी यांनी या कामाची पाहणी करत नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी जास्तीत जास्त खबरदारी करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.यावेळी अत्रे रंगमंदिराचे प्रभारी व्यवस्थापक माणिक शिंदे, आणि सावित्रीबाई फुले नाट्यगृहाचे प्रभारी व्यवस्थापक दत्तात्रय लदवा यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.   

लॉकडाऊन नंतर नाटकाच्या पहिल्या प्रयोगासाठी अत्रे रंगमंदिर सज्ज सुरक्षिततेचे नियम पाळून होणार नाट्यप्रयोग लॉकडाऊन नंतर नाटकाच्या पहिल्या प्रयोगासाठी अत्रे रंगमंदिर सज्ज सुरक्षिततेचे नियम पाळून होणार नाट्यप्रयोग  Reviewed by News1 Marathi on December 11, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

ट्रेलने सोशल कॉमर्स प्लॅटफॉर्म ‘ट्रेल शॉप’ लॉन्च केला

◆ लाखो लोकांना लघु उद्योजक बनण्यासाठी सक्षम करण्याचा उद्देश.. मुंबई, २२ जानेवारी २०२१ :  भारतातील सर्वात मोठा लाइफस्टाइल कम्युनिटी मंच ट्रेल...

Post AD

home ads