Header AD

कल्याण डोंबिवलीत १२४ नवे रुग्ण तर २ मृत्यू

 

■५४,५८४ एकूण रुग्ण तर १०६५ जणांचा आता पर्यंत मृत्यू तर २४ तासांत १६९ रुग्णांना डिस्चार्ज...



कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज नव्या १२४ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर दोन जणांचा मृत्यू झाला असून गेल्या २४ तासांत १६९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.    


आजच्या या १२४ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ५४,५८४ झाली आहे. यामध्ये १६६८ रुग्ण उपचार घेत असून ५१,८५१ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत १०६५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या १२४ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व- २१कल्याण प – ४६डोंबिवली पूर्व –३९डोंबिवली प – १५, तर  मांडा टिटवाळा –   येथील ३ रूग्णाचा समावेश आहे. 


        डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी २१ रुग्ण टाटा आमंत्रामधून५ रुग्ण हे वै.ह.भ.प. सावळाराम म्हात्रे क्रीडा संकुल येथून, ५ रुग्ण पाटीदार कोविड केअर सेंटरमधून, ५ रुग्ण डोंबिवली जिमखाना कोविड रुग्णालयातून व उर्वरित रुग्ण हे इतर रूग्णालयामधून तसेच होम आयसोलेशन मधून बरे झालेले आहेत.

कल्याण डोंबिवलीत १२४ नवे रुग्ण तर २ मृत्यू कल्याण डोंबिवलीत १२४ नवे रुग्ण तर २ मृत्यू Reviewed by News1 Marathi on December 04, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

नगरसेवक उमेश पाटील यांच्या हस्ते रस्त्याचे सिमेंट काँक्रीट करण्याची शुभारंभ

कळवा  , अशोक  घाग  :   प्रभाग क्रमांक 9 स्थानिक नगरसेवक उमेश पाटील यांच्या प्रभाग सुधारणा निधीतून खारीगाव येथील दत्तवाडी परिसरातील विघ्नहर्त...

Post AD

home ads