Header AD

राष्ट्रवादीच्या वतीने अंगणवाडीच्या मुलांना वजन काट्याची भेट
कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ८० व्या वाढदिवसा निमित्य तसेच स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या जंयती निमित्य राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी व मुंडे फाँडेशनचे प्रशांत माळी यांच्या वतीने प्रभाग क्र ३० मल्हारनगर मधिल १५३ नं अंगणवाडी मधिल चिमुकल्यांना वजन काटा व खाऊ वाटप करण्यात आला. 


अंगणवाडी मार्फत अनमोल सहकार्याबाबत शिक्षिका तांगडे व सोनावने यांचा कोरोना योद्धा म्हणुन सत्कार करण्यात आला. या प्रंसगी  प्रदेश अ वि सचिव फारूक पठाण, जावेद सैय्यद व प्रभागातील नागरीक उपस्थित होते. अंगणवाडीत येणाऱ्या चिमुकल्यांच्या सुधृड आरोग्यासाठी त्यांचे नियमित वजन करणे आवश्यक असल्याने हा वजनकाटा भेट दिला असल्याची माहिती प्रशांत माळी यांनी दिली.

राष्ट्रवादीच्या वतीने अंगणवाडीच्या मुलांना वजन काट्याची भेट राष्ट्रवादीच्या वतीने अंगणवाडीच्या मुलांना वजन काट्याची भेट Reviewed by News1 Marathi on December 15, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

किसान बाग आंदोलनाला राज्यात उत्स्फूर्त प्रतिसाद प्रकाश आंबेडकर

◆ किसान बाग आंदोलनाला राज्यात उत्स्फूर्त प्रतिसाद, मुंबईत मात्र हजारो कार्यकर्त्यांची धरपकड, आघाडी सरकार शेतकरी विरोधी असल्याचे दाखवून दिले....

Post AD

home ads