Header AD

नवऱ्याचे निधन झाल्याने बायकोने सुरु केला 'नशेबाजी'चा व्यापार

 

■पोलिसांना सुगावा लागल्याने दुकलीसह गजाआड..


कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  नशेबाजीचा व्यापार करतानाच नवऱ्याचे निधन झाल्याने बायकोने तस्करीचा वारसा पुढे नेत नशेबाजीचा व्यापार सुरु केला. मात्र पोलिसांना सुगावा लागल्याने तिच्यासह तस्कर दुकलीला महात्मा फुले चौक पोलिसांना या त्रिकुटाला  गजाआड करण्यात यश आले आहे. उषाबाई रमेश पाटील, (वय४५  रा.पारोळा,  जि. जळगांव) असे गांजा तस्करी प्रकरणी अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. तर  रोशन पांडुरंग  पाटील,  अशोक इबु कंजर, (वय ४६) असे तिच्यासह  अटक केलेल्या दुकली तस्करांची नावे आहे.

 

महात्मा फुले चौक पोलीस  ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक नारायण बानकर यांना  एक तस्कर  गांजा घेऊन कल्याममध्ये येत असल्याची माहिती खबऱ्याने दिली होती. या माहितीच्या आधारावर  कल्याणच्या शिवाजी चौक परिसरात पोलिसांनी सापळा लावला असता  गांजा घेऊन आलेल्या  तस्कर  रोशन पाटील  पोलिसांनी ताब्यात घेतले. तस्कर रोशन हा  जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातून कल्याणला आला होता. त्याच्याकडून १.७५  किलो गांजा हस्तगत केला आहे. मात्र तस्कर रोशनने पोलिसांना  धक्कादायक माहिती दिली.


हा गांजा जळगाव जिल्ह्यातील पारोळा येथे नशेबाजीचा व्यापार करणारी उषा पाटील आणि अशोक कंजर यांच्याकडून आणला होता. त्यांनतर सहायक पोलिस निरिक्षक दीपक सरोदे यांच्या नेतृत्वात पोलिसांचे एक पथक जळगावला तपासासाठी गेले. जळगावहून तस्कर अशोक कंजर आणि नशेबाजीचा व्यापार करणाऱ्या उषा पाटील दोघांना ताब्यात घेतले.  तर तिच्या जोडीला  अशोक  कंजर हा मोठा गांजा तस्कर असल्याचे पोलीस तपासत समोर आले आहे. विशेष म्हणजे पोलिसांनी काही दिवसापूर्वी ११६ किलो गांजा या  दोघांकडे मिळून आला होता अशी माहिती गुन्हे निरिक्षक संभाजी जाधव यांनी दिली आहे.


गांजा तस्कर मध्यप्रदेशातून कमी भावात  गांजा घेऊन पंचवीस पट अधीकच्या भावाने विकत असल्याची खळबळजनक माहिती कल्याणला अटक केलेल्या त्रिकूटकाकडून पोलिसांना मिळाली आहे. विशेष म्हणजे मध्यप्रदेशात हा गांजा ५०० ते ६०० रुपये किलो दराने विकत घेतला जातो. जळगावमध्ये हा गांजा ३ हजार रुपयांमध्ये विकला जातो. कल्याणात येई र्पयत ही किंमत १३ हजार रुपये किलो होते. गांजाच्या व्यापारात बक्कळ फायदा असल्याने नवऱ्याच्या निधनानंतर बायकोने हा नशेबाजीचा  गोरखधंदा सुरु केला होता.

नवऱ्याचे निधन झाल्याने बायकोने सुरु केला 'नशेबाजी'चा व्यापार नवऱ्याचे निधन झाल्याने बायकोने सुरु केला 'नशेबाजी'चा व्यापार Reviewed by News1 Marathi on December 15, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

नगरसेवक उमेश पाटील यांच्या हस्ते रस्त्याचे सिमेंट काँक्रीट करण्याची शुभारंभ

कळवा  , अशोक  घाग  :   प्रभाग क्रमांक 9 स्थानिक नगरसेवक उमेश पाटील यांच्या प्रभाग सुधारणा निधीतून खारीगाव येथील दत्तवाडी परिसरातील विघ्नहर्त...

Post AD

home ads