भारतीय जनता युवा मोर्चा, कल्याण जिल्हा कार्यकारणी घोषित
डोंबिवली , शंकर जाधव : भाजपा कल्याण जिल्हा अध्यक्ष शशिकांत कांबळे ह्यांच्या प्रमुख उपस्थितीत, भाजपा कल्याण जिल्हा कार्यालयात, भाजयुमो कल्याण जिल्हा अध्यक्ष मिहिर देसाई ह्यांनी, युवा मोर्चाची जिल्हा कार्यकारणी घोषित केली. वरुण पाटील, चिंतामण लोखंडे, पवन पाटील, आरती देशमुख, कुलदीप चोप्रा ह्यांची जिल्हा सरचिटणीस म्हणून नियुक्ती करण्यात आली. याप्रसंगी भाजपा जिल्हा संघटन सरचिटणीस मनोज राय, सरचिटणीस अर्जुन म्हात्रे, भाजयुमो महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष निखिल चव्हाण, भाजयुमो महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष परेश गुजरे उपस्थित होते. कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, टिटवाळा, श्रीमलंग ह्या परिसरात गरजू रुग्णांना त्वरित रक्तदाते उपलब्ध व्हावे ह्या करिता, सचिव अमेय गोखले आणि सचिव चिंतन देढिया ह्यांची रक्तदाता सूची संयोजक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

Post a Comment