Header AD

ठाणे जिल्हा माध्यमिक शाळा शिक्षकेत्तर संघटनेकडून शिक्षण विभागाच्या परिपत्रकाची होळी

 भिवंडी ,  प्रतिनिधी  : भविष्यात राज्यातील मान्यता प्राप्त खाजगी अनुदानित,अंशतः अनुदानित,विना अनुदानित तसेच माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील वर्ग - ४ च्या श्रेणीतील शिपाई पदांची भर्ती कंत्राटी पध्दतीने भरण्यात येणार आहेत.त्यामुळे शिपाई पदाच्या कर्मचाऱ्यांची सरकारी सेवा खंडीत होणार आहे.याबत शिक्षकेत्तर  कर्मचाऱ्यांसाठी  महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाने शासन निर्णय क्रमांक एस.एस.एन. २०१५ दिनांक :- ११/१२/ २०२० अन्वयेच्या शालेय शिक्षण व क्रिडा विभाग मुंबईच्या शासन निर्णय(जी.आर.) काढला आहे. या अन्याय कारक परिपत्रकाचा जाहीर निषेध करून या शासन निर्णयाची सोमवारी दुपारी शिक्षणाधिकारी कार्यालय,जिल्हा परिषद ठाणे येथे शिक्षकेत्तर संघटनेच्यावतीने शासन निर्णयाची  राखरांगोळी, होळी करण्यात आली व व हा आदेश मागे घ्यावा यासाठी ठाणे शिक्षणाधिकाऱ्यांना संघटनेच्यावतीने  निवेदन देण्यात आले. 


या शासन आदेशामुळे संपूर्ण राज्यातील लाखो चतुर्थ श्रेणीतील पदे रद्द होणार असून ग्रामीण भागत फक्त पाच हजार मानधनावर कंत्राटी पधतीने पदे भरणार आहेत. शिवाय ते पाच हजार हि वेतनेत्तर अनुदानातून मिळणार आहेत.त्याचाही काहीही भरोसा नाही.त्यामुळे जोपर्यंत शासन आदेश रद्द होत नाही तोपर्यंत हा लढा सुरूच राहील असे वक्तव्य शिक्षकेतर संघटनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष भरत जाधव यांनी केले .या आंदोलनात ठाणे जिल्हा शिक्षकेत्तर संघटनेचे सर्व जिल्हा,तालुका  पदाधिकारी उपस्थित होते.त्यामध्ये भरत जाधव  (अध्यक्ष),आर.एस. खैरनार (कार्याध्यक्ष),अतुल पाटील (कार्यवाह) कुणाल दोंदे (राज्यउपाध्यक्ष) श्रीमती योगीता गोराडकर (उपकार्यवाह), सुनील अहिरराव (उपकार्यवाह), दिपक दिनकर (शहापूर तालुका अध्यक्ष), ठाणे जिल्हा माजी अध्यक्ष प्रमोद पाटील, एस.डी.डोंगरे, रामदास म्हात्रे, बबन वंजारी,रविंद्र राजपूत, सावंत ठाकूर  ,प्रकाश शिंगरे (ठाणे तालुका अध्यक्ष) आदींसह अन्य शिक्षकेत्तर कर्मचारी सहभागी झाले होते.
ठाणे जिल्हा माध्यमिक शाळा शिक्षकेत्तर संघटनेकडून शिक्षण विभागाच्या परिपत्रकाची होळी ठाणे जिल्हा माध्यमिक शाळा शिक्षकेत्तर संघटनेकडून शिक्षण विभागाच्या परिपत्रकाची होळी Reviewed by News1 Marathi on December 14, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

टेलगट ट्युमर सारख्या दुर्धर आजाराची शस्त्रक्रिया पहिल्या प्रयत्नात डोंबिवलीत बाज आर आर रुग्णालयात यशस्वी..संपूर्ण देशात या आजाराचे केवळ ५३ रुग्ण

  डोंबिवली ( शंकर जाधव )  जन्माला येतानाच काही जनुकीय रचनांमध्ये बदल झाल्यास भविष्यात  टेलगट ट्युमर नावाचा  दुर्मिळ आजार होण्याची शक्यता असत...

Post AD

home ads