ऑनलाईन रस्ता सुरक्षा जनजागृती अभियान संपन्न
कल्याण , कुणाल म्हात्रे : विद्यामंदिर मांडा टिटवाळा शाळेतर्फे ऑनलाईन सुरक्षा जनजागृती अभियान कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी आर.एस.पी.चे क.डों.म.पा. अधिकारी मनीलाल शिंपी, किनगे, महादेव क्षिरसागर, भारती जाधव व इतर अधिकारी उपस्थित होते.भारती जाधव यांनी आपल्या मार्गदर्शनात वाहतुकीच्या नियमांची माहिती दिली. तसेच या पथकात महिला शिक्षकांनी सहभाग घ्यावा असे सुचवले. क्षिरसागर यांनी रस्ता सुरक्षेच्या नियमांची माहिती दिली. किनगे यांनी रस्ता सुरक्षेच्या नियमांची सखोल माहिती दिली. त्याचबरोबर आपण शिक्षकांनी या देशाचे आदर्श नागरिक तयार करण्यासाठी आर.एस.पी. शिक्षक म्हणून काम करावे.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविलेले आर.एस.पी. कमांडर मनीलाल शिंपी यांनी प्रत्येक शाळेत आर.एस.पी.चे युनिट असावे. तसेच समाजातील आपत्कालीन परिस्थितीत आपण शिक्षकांनी पुढे यावे कारण आपल्याला या विषयाचे चांगले ज्ञान असते असे सांगतिले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात शाळेचे मुख्याध्यापक तळेले यांनी असे सांगितले की, सदर कार्यक्रम शाळेतूनच का घ्यावा? याचे कारण की, एका विद्यार्थ्याला ही माहिती दिल्यानंतर तो आपल्या पुर्ण कुटुंबाला जागृत करू शकतो. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चौधरी यांनी केले. रस्ता सुरक्षा पथक या गीताचे गायन झाल्टे यांनी केले तर उपस्थित मान्यवरांचे आभार खडके यांनी मानले. या सर्व ऑनलाइन कार्यक्रमाच्या तांत्रिक बाबी तंत्रस्नेही शिक्षक करवंदे यांनी केले व या कार्यक्रमाचे आयोजन आर. एस.पी.शिक्षक दीक्षित सर यांनी केले.

Post a Comment