Header AD

‘त्या’ बाळाची मृत्यूशी झुंज ठरली अपयशी

 कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  कल्याण पूर्वेतील तिसगाव आमराई परिसरात कचरा कुंडी शेजारी सापडलेल्या नवजात अर्भकाला मनसे पदाधिकाऱ्यांनी जीवनदान दिले होते. मात्र या बाळाची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली असून या बाळाची आज पहाटे प्राणज्योत मालवली आहे.


 बुधवार ९ डिसेंबर रोजी सकाळी कल्याण पूर्वेतील तिसगाव रोड परिसरातील यशवंत हाईट्स इमारतीच्या पाठीमागे नाल्याचे काम करीत असताना कामगाराला एका ओढणीत बांधलेला अवस्थेत अर्भक दिसले. त्याने लागलीच मनसेचे कार्यकर्ते व माजी नगरसेवक अनंता गायकवाड यांना फोनवर अर्भक सदृश वस्तू असल्याची खबर दिली. समाजसेविका योगिता गायकवाड, मनसेचे पदाधिकारी योगेश गव्हाणे यांनी या बाळाला आधी पालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात नेले. मात्र पालिकेच्या रुग्णालयात बालरोग तज्ञ नसल्याने या बालकाला इतरत्र नेण्याचा सल्ला पालिकेच्या डॉक्टरांनी दिली. त्यावेळी त्याल सिंडिकेट येथील मेट्रो रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.


गेले पाच दिवस त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले, काल त्याची तब्येत नॉर्मल असल्याचे डॉक्टरांना समजल्यावर त्याला व्हेंटिलेटररून साध्या कक्षात उपचारासाठी ठेवण्यात आले. अखेर सहा दिवसांनंतर जगण्याची धडपड करणाऱ्य या लढवय्या योद्ध्याची प्राणज्योत  आज पहाटे मालवली. या बाळावर मेट्रो रुग्णालयात डॉ. झबक दांपत्याने मोफत उपचार सुरु ठेवले होते.


बाळाला वाचविण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणारे मनसेचे माजी आमदार प्रकाश भोईरसमाजसेविका योगिता गायकवाड व मनसेच्या जिल्हाध्यक्षा स्वाती कदम यांना अश्रू अनावर झाले. बाळाच्या निधनाची बातमी समजताच कल्याणमधील सर्व स्तरातून शोक व्यक्त होत आहे.दरम्यान केडीएमसीच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात बालरोगतज्ञ नसल्याने या बालकावर वेळेत उपचार न झाल्याने या बालकाचा मृत्यू झाल्याचा आरोप मनसेचे माजी नगरसेवक अनंता गायकवाड यांनी केला आहे. तर याबाबत रुक्मिणीबाई रुग्णालयाच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी अश्विनी पाटील यांना विचारले असता, आपण मिटिंगमध्ये असल्याचे सांगत अधिक बोलण्यास नकार दिला.   


‘त्या’ बाळाची मृत्यूशी झुंज ठरली अपयशी ‘त्या’ बाळाची मृत्यूशी झुंज ठरली अपयशी Reviewed by News1 Marathi on December 15, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

कल्याण डोंबिवलीत २२५ नवे रुग्ण तर १८ मृत्यू ५२८ रुग्णांना डिस्चार्ज

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :     कल्याण डोंबिवली   महानगर पालिका   क्षेत्रा त   आज   २२५  कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ ता...

Post AD

home ads