लोकस्वराज्य फिल्म अॅड टेलिव्हिजन ट्रेड युनियनची डोंबिवलीत बैठक संपन्न
डोंबिवली ,शंकर जाधव : लोकस्वराज्य फिल्म अॅड टेलिव्हिजन ट्रेड युनियनची रविवारी डोंबिवलीत बैठक संपन्न झाली. पूर्वेकडील आधार न्यूज कार्यालयात संपन्न झालेल्या बैठकीत उपतक्रार निवारण प्रमुख विनायक कांगणे, ठाणे जिल्हा अध्यक्ष महेश दवंडे,जिल्हा अध्यक्ष विशाल मोहिते,कल्याण-डोंबिवली उपकार्याध्यक्ष तथा पत्रकार शंकर जाधव, प्रवीण गायकवाड,विकास थोरात,अनिकेत शिंदे,योगेश मोरे,चैताली जावकर आदि पदाधिकारी उपस्थित होते.या बैठकीत युनिनियच्या पुढील कामकाजाबाबत चर्चा करण्यात आली.
युनियनची माहिती आणि कामे जनसामान्यांपर्यत पोहोचणे, कलाकाराने काम करताना त्याच्या कामाबाबत करार करावा जेणेकरून कलाकारावर अन्याय होत असेल तर युनियन त्याला न्याय देण्यास मदत करील अशी महिती सर्व कलाकारांना देणे, या युनियनमध्ये प्रोड्युसर यांनाही सहभागी करावे या व अश्या अनेक गोष्टींवर चर्चा क्करण्यात आली.आजही असे अनेक कलाकार असे आहेत कि ज्यांना फक्त व्यासपीठ मिळाले नाही म्हणून त्याची कला जगासमोर आली नाही, अश्या कलाकारांना प्रकाशझोकात आणण्यासाठी युनियनच्या प्रत्येक पदाधिकारी आणि सदस्यांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे असे यावेळी कांगणे यांनी सांगितले.

Post a Comment