संचारबंदीचे उल्लंघन करणार्यांवर उत्पादन शुल्क विभागाची कारवाई
कल्याण, कुणाल म्हात्रे : कोरोनाचा प्रतिबंध रोखण्यासाठी राज्य सरकारने रात्री ११ ते सकाळी ६ पर्यंत संचारबंदी असतानाही धाबे, चायनीज कॉर्नर आणि अवैध दारू वाहतूक करणाऱ्या वाहनावर कल्याण दारू बंदी उत्पादन शुल्क विभाग कल्याण यांच्या पथकाने मंगळवारी रात्री धडक कारवाई केली आहे.
या कारवाईत अवैधरित्या दारू बाळगणाऱ्या, विक्री करणाऱ्या कल्याण शहर तसेच ग्रामीण परिसरातील २ धाबे, २ चायनीज दुकाने, तसेच कल्याण शहर भागात औवध रित्या दारु वाहतूक करणाऱ्या १ दुचाकी वाहनास, १ औवध हुक्का पार्रल वर कारवाईचा बडगा उचलीत अवैध दारू वाहतुक प्रकरणी दुचाकी जप्त करीत एकाला अटक केली आहे.

Post a Comment