Header AD

कल्याणच्या विकासासाठी कायम कटिबद्ध माजी आमदार नरेंद्र पवार

 


■वडवलीमध्ये गणेश घाट सुशोभीकरण व मंदिर शेडचे लोकार्पण सोहळा संपन्न...


कल्याण , कुणाल म्हात्रे  :  विकासाची गंगा शेवटच्या घटकांपर्यंत पोहचली पाहिजे. विविध योजनांचा माध्यमातून काम करत असतानाच माझ्या आमदार निधीतून कल्याण पश्चिममध्ये अनेक विकासकामे करण्याचा प्रयत्न केला. वेगवेगळी कामे मार्गी लागली. वडवलीच्या नागरिकांनी गणेश घाट सुशोभीकरण करण्याचा आणि मंदिर शेड साकारण्याचा विषय मांडला त्यावर तातडीने निधी दिला आणि हे काम मार्गी लागले.


 रस्ते, पाणी, वीज एवढेच नाही तर सुजलाम सुफलाम कल्याण करण्यासाठी आपण सर्वजण काम करतोय. आमदार निधीतून सुरू केलेल्या कामाचे लोकार्पण संपन्न होत आहे याचा आनंद आहे. शेवटच्या माणसाचा विकास, न्याय देण्यासाठी आणि कल्याणच्या विकासासाठी कायम कटिबद्ध असल्याचे मत माजी आमदार तथा भाजपा भटके विमुक्त आघाडीचे प्रदेश संयोजक नरेंद्र पवार यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.


प्रभाग क्रमांक ६ वडवली येथे गणेश घाट नूतनीकरण व सुशोभीकरण आणि गावदेवी मंदिर समोरील शेडच्या कामाचा लोकार्पण सोहळा माजी आमदार नरेंद्र पवार यांच्याहस्ते संपन्न झाला.यावेळी माजी उपमहापौर तथा नगरसेविका उपेक्षा भोईर, नगरसेविका हर्षाली थविल, मोहोने - टिटवाळा मंडळ अध्यक्ष शक्तीवान भोईर, भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष निखिल चव्हाण, महिला मोर्चा प्रदेश सचिव प्रिया शर्मा,  महिला मोर्चा उपाध्यक्ष प्रीती दीक्षित,  सदा कोकणे, आदी कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
कल्याणच्या विकासासाठी कायम कटिबद्ध माजी आमदार नरेंद्र पवार कल्याणच्या विकासासाठी कायम कटिबद्ध माजी आमदार नरेंद्र पवार Reviewed by News1 Marathi on December 02, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

कोव्हिड-१९ पीडितांसाठी एमजीच्या ग्राहकांनी उभारला निधी

■ बायोडिग्रेडेबल बेडशीट केल्या दान; उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले उपक्रमाचे कौतुक ..   महाराष्ट्र, १८ मे २०२१ :  एमजी मोटर इंडियाने पुण...

Post AD

home ads