भिवंडीत स्वच्छता अभियानात पालिका आयुक्त उतरले रस्त्यावर
भिवंडी , प्रतिनिधी : भिवंडी शहरात महास्वच्छता अभियान राबविण्यासाठी चक्क पालिका आयुक्त डॉ.पंकज आशिया हे झाडू घेऊन रस्त्यावर उतरल्याने प्रशासनाची व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या तारांबळ उडाली असल्याचे चित्र शहरात दिसून आले .
यावेळी आरोग्य विभागाचे उपायुक्त मारुती गायकवाड, शहर अभियंता लक्ष्मण गायकवाड,उपअभियंता संदीप सोमाणी, प्रभारी आरोग्य अधिकारी हेमंत गुळवी, अग्निशमन अधिकारी राजेश पवार, प्रभाग समिती क्रमांक १ चे सहायक आयुक्त दिलीप खाने, प्रभाग समिती क्रमांक ५ चे कार्यालय अधीक्षक सोमनाथ सुनील भोईर,जनसंपर्क अधिकारी मिलिंद पळसुले, उद्यान विभाग प्रमुख निलेश संखे, आरोग्य निरीक्षक अशोक संखे, जयवंत सोनावणे, एम.पी.विषे, हरेश भंडारी, एफ. एफ. गोम्सनी आपल्या हातात झाडू घेऊन मुख्यालय परिसर साफसफाई केली. यावेळी या साफसफाई मोहिमेत सफाई,गटर सफाई, औषध फवारणी करून प्लास्टिक जमा करण्यात आले सदर ठिकाणी , मुख्य आरोग्य निरीक्षक , सर्व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.
भिवंडीत स्वच्छता अभियानात पालिका आयुक्त उतरले रस्त्यावर
Reviewed by News1 Marathi
on
December 25, 2020
Rating:

Post a Comment