Header AD

फी सक्ती करणाऱ्या साकेत शाळा प्रशासना विरोधात मनसे आक्रमक


■कोळसेवाडी पोलिसांनी मनसे, मनविसे पदाधिकार्यांना ताब्यात घेऊन सोडले....


कल्याण , कुणाल  म्हात्रे   :  कोरोना काळात विद्यार्थ्याकडे फी भरण्यासाठी सक्ती करणाऱ्या कल्याण पूर्वेतील साकेत शाळा प्रशासनाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली असून शाळेत याबाबत आंदोलन करण्यात आले. शाळेत आंदोलन करणाऱ्या मनसे आणि मनविसेच्या कार्यकर्त्यांनी कोळसेवाडी पोलिसांनी ताब्यात घेत काही वेळानंतर सुटका केली.


कल्याण पूर्वेतील अनेक पालकांच्या तक्रारीनंतर आज कल्याण पूर्वेतील मनसे व मनविसे तर्फे साकेत शाळा प्रशासनाची कानउघडणी केली. कोरोना लॉकडाऊन असताना, तसेच अनेक पालकांकडे नोकरी नसताना वार्षिक शुल्क दरवाढ,पालकांच्या घरी जाऊन शुल्क वसुली, शुक्ल भरण्याची वारंवार सक्ती या व इतर अनेक  विषयावर मनसे आक्रमक होत साकेत शाळेत निदर्शने करत आंदोलन केले.  


शाळेचा वार्षिक शुल्क कमी करावी. येणाऱ्या वर्षा पासून डी. डी. देणार नाही. वार्षिक फी टप्प्या टप्प्याने भरण्याची मुभा मिळावी. दर महिन्याला पालक सभा घेण्यात यावी. शाळेत पिण्याच्या पाण्याची सोय चांगली असावी. शाळेतले अनेक वर्ग जे खराब झाले आहेत ते सुधारावे आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. मनसेच्या आक्रमकपणामुळे शाळा प्रशासनाने २ तारखेला मनसे पदाधिकारी,पालक,शाळा प्रशासन यांची एकत्रित  बैठक बोलावली असून या बैठकीत पालकांच्या सर्व मागण्यांचा विचार केला जाईल असे सांगण्यात आले.


या वेळी मनविसे शहर अध्यक्ष निर्मल निगडे, मनविसे उपशहर अध्यक्ष अंकुश राजपूत, सतीश उगले, मनसे उप विभाग अध्यक्ष गंगाधर कदमउपशाखा अध्यक्ष रमेश शिंदे यांना कोळसेवाडी पोलिसांनी ताब्यात घेत नंतर सुटका केली. या आंदोलनात मोठ्या संख्येने पालक आणि मनसे कार्यकर्ते सहभागी झाले होते.

फी सक्ती करणाऱ्या साकेत शाळा प्रशासना विरोधात मनसे आक्रमक फी सक्ती करणाऱ्या साकेत शाळा प्रशासना विरोधात मनसे आक्रमक Reviewed by News1 Marathi on December 30, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

टेलगट ट्युमर सारख्या दुर्धर आजाराची शस्त्रक्रिया पहिल्या प्रयत्नात डोंबिवलीत बाज आर आर रुग्णालयात यशस्वी..संपूर्ण देशात या आजाराचे केवळ ५३ रुग्ण

  डोंबिवली ( शंकर जाधव )  जन्माला येतानाच काही जनुकीय रचनांमध्ये बदल झाल्यास भविष्यात  टेलगट ट्युमर नावाचा  दुर्मिळ आजार होण्याची शक्यता असत...

Post AD

home ads