Header AD

वंचित बहुजन आघाडीचे पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयाच्या आवारात ठिय्या आंदोलन
डोंबिवली , शंकर जाधव  :  काही दिवसांपूर्वी डोंबिवलीतील पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात क्रश्ना डायग्नोस्टिक सेंटरचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. मात्र एमआरआय वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिली नसल्याने शुक्रवारी वंचित बहुजन आघाडीने शास्त्रीनगर रुग्णालयाच्या आवारात ठिय्या आंदोलन केले.वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी ठिय्या करताना पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. त्यानंतर शिष्टमंडळाने मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. सुहासिनी बडेकर यांची भेट घेऊन निवेदन दिले.


या आंदोलनात डोंबिवली शहर अध्यक्ष सुरेंद्र ठोके,क.डों.संघटक मिलिंद साळवे,ठा.जि.सचिव रेखा कुरवारे, उपाध्यक्ष राजू काकडे,बाजीराव माने,अर्जुन केदार,अशोक गायकवाड,विजय इंगोले,निलेश कांबळे,योगेश सुतार,गणेश गायकवाड,आकाश भास्कर,रामकिसन हिंगे,संतोष खंदारे,सोहम मोरे,राहुल अंभोरे,आतिष जोंधळे,अमोल पाईकराव,राजू खरात, लिंबाजी सुतार यासह अनेक कार्यकर्ते ठिय्या आंदोलनात सहभागी झाले होते.यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.


यावेळी क.डों.संघटक मिलिंद साळवे म्हणाले,पालिकेतील क्रश्ना डायग्नोस्टिक सेंटरमध्ये एमआरआय वैद्यकीय सेवा उपलब्ध न करता जनतेची दिशाभूल करत उद्घाटन करण्यात आले होते.लवकरात ही सेवा नागरिकांसाठी उपलब्ध करून द्यावी अन्यथा वंचित बहुजन आघाडी तीव्र आंदोलन करेल.त्यानंतर वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळाने मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. सुहासिनी बडेकर यांची भेट घेऊन निवेदन दिले. डॉ. बडेकर यांच्याशी यासंदर्भात चर्चा केली. तर डॉ. बडेकर यांनी लवकरच सदर वैद्यकीय सेवा नागरिकांसाठी सुरु करू असे आश्वासन दिले.

वंचित बहुजन आघाडीचे पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयाच्या आवारात ठिय्या आंदोलन वंचित बहुजन आघाडीचे पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयाच्या आवारात ठिय्या आंदोलन Reviewed by News1 Marathi on December 11, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

मनसेच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न

कल्याण , प्रतिनिधी  :   महाराष्ट्र नवनिर्माण सेना व महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना यांच्यातर्फे  गुरुवारी  कल्याण पूर्वेत कोळसेवाडी मध...

Post AD

home ads