राजे भोसले, फुले,शाहू,आंबेडकर प्रतिष्ठानच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण दिनी पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले
ठाणे, प्रतिनिधी : सालाबाद प्रमाणे राजे भोसले ,फुले ,शाहू आंबेडकर, प्रतिष्ठानच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण दिनी ठाणे स्टेशन, व कोर्ट नाका डॉ बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा या ठिकाणी ५ डिसेंबर रात्रो १२ वा संस्थेचे अध्यक्ष, कर्मवीर सुनिल खांबे यांनी असंख्य भीम अनुयायांच्या उपस्थितीत भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार ,महामानव ,प पृ डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
त्या नंतर सदर उपस्थिती भन्तेजी यांनी बुद्ध वंदना घेऊन ठाणे स्टेशन येथे डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन केले कर्मवीर सुनील खांबे यांनी उपस्थित भीम अनुयायांना मार्गदर्शन केले की करोना व्हायरस सारखी भयंकर भीती असताना आपण असंख्य अनुयायी डॉ.बाबासाहेबाना अभिवादन करण्यासाठी आले असताना सोशल डिस्टन्स ठेऊन गर्दी न करता अभिवादन करावे.
पुढे सुनील खांबे म्हणाले की माझा मुलगा राष्ट्रपाल ह्याचे ४ महिन्या पूर्वी दुःखद निधन झाले त्याचाही खूप मोठा सहभाग असायचा मी हे दुःख बाजूला ठेऊन माझी मुलगी अनुर्षा खांबे हिच्या सहकार्याने हा अभिवादनाचा कार्यक्रम करण्याचे ठरवले.ह्या कार्यक्रमासाठी नौपाडा प्रभात समितीच्या सहाय्यक आयुक्त प्रणाली घोंगे व ठाणे नगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री रामराव सोमवंशी ,फायर ब्रिगेडचे श्री.देवरे व आदी कर्मचाऱ्यांचे व उपस्थित भीम अनुयायांचे कर्मवीर सुनील खांबे यांनी विशेष आभार मानले त्या प्रसंग असंख्य भीम अनुयायी सोशल डिस्टन्स ठेऊन उपस्थित होते .

Post a Comment