Header AD

भिवंडीत फोर्टी प्लस ग्रामीण क्रिकेट स्पर्धा उत्साहात संपन्न

 



भिवंडी ,  प्रतिनिधी  :  भिवंडी तालुक्यात फोर्टी प्लस क्रिकेट सामने खेळणाऱ्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने या फोर्टी प्लस क्रिकेट सामन्यांचे भिवंडीत वेगळेच स्थान निर्माण झाले असून क्रिकेटबद्दल खेळाडूंची आवड देखील वाढली आहे.टेमघर सोनादेवी क्रिकेट संघ कमिटीचे अध्यक्ष पद्माकर चौधरी यांच्या माध्यमातून नुकतेच टेमघर येथील ग्राउंडवर फोर्टी प्लस क्रिकेट सामन्यांचे आयोजन केले होते.या सामन्यांमध्ये एकूण ४५ गावांच्या क्रिकेट संघांनी भाग घेतला होता.विशेष म्हणजे हि चाचणी स्पर्धा मोफत असल्याने अनेक खेळाडूंनी या स्पर्धेत भाग घेतला होता.


या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक सोनादेवी क्रिकेट संघाने पटकावले असून द्वितीय पारितोषिक वीर तानाजी दापोडे या संघाने तर तृतीय पारितोषिक अष्ठविनायक संघ ठाकूरपाडा यांनी पटकावले.या सामन्यांमध्ये वीर तानाजी क्रिकेट संघाचा राजू पाटील मॅन ऑफ द मॅच ठरला असून राजू पाटील याने ८९ धावा काढत ३ गाडी बाद केले होते . तर उत्कृष्ट फलंदाज म्हणून कालूराम भोईर यांना सन्मानित करण्यात आले असून उत्कृष्ट गोलंदाज म्हणून मनोज पाटील यांस सन्मानित करण्यात आले आहे. भिवंडी तालुक्यात गेल्या दहा वर्षांपासून फोर्टी प्लस क्रिकेटची मोठी रेलचेल सुरू झाली असून क्रीडा संघटनेच्या माध्यमातून शिवसेना युवा नेते कुंदन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या फोर्टी प्लसच्या स्पर्धा गोवा ,गुजरात आदी राज्यात देखील खेळवल्या जात आहेत.
भिवंडीत फोर्टी प्लस ग्रामीण क्रिकेट स्पर्धा उत्साहात संपन्न भिवंडीत फोर्टी प्लस ग्रामीण क्रिकेट स्पर्धा उत्साहात संपन्न Reviewed by News1 Marathi on December 02, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

वारसा हक्काच्या नोकरी साठी सफाई कामगारची ५ लाखांची फसवणूक

◆तक्रार मागे घेण्यासाठी केली मारहाण   केडीएमसी कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल... कल्याण , कुणाल  म्हात्रे  :   कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत आपल्य...

Post AD

home ads