Header AD

कल्याण डोंबिवलीत कोरोना रुग्णांची संख्या ५७ हजार पार १०० नवे रुग्ण तर १ मृत्यू


■५७,०६६ एकूण रुग्ण तर १०९६ जणांचा आता पर्यंत मृत्यू तर २४ तासांत १३२ रुग्णांना डिस्चार्ज...


कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांची संख्या ५७ हजार पार गेली असून आज नव्या १०० कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर एकाचा मृत्यू झाला असून गेल्या २४ तासांत १३२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.    

 

आजच्या या १०० रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ५७,०६६ झाली आहे. यामध्ये १०७३ रुग्ण उपचार घेत असून ५४,८९७ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत १०९६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या १०० रूग्णांमध्ये कल्याण पूर्व-११कल्याण प – ३६डोंबिवली पूर्व २९डोंबिवली प – २०, मांडा टिटवाळा -३, तर मोहना येथील १ रूग्णाचा समावेश आहे. 


 

        डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी ५ रुग्ण वै.ह.भ.प. सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुल येथून७ रुग्ण डोंबिवली जिमखाना समर्पित रुग्णालय येथून, ५ रुग्ण पाटीदार कोविड केअर सेंटर मधून व उर्वरित रुग्ण हे इतर रूग्णालयामधून तसेच होम आयसोलेशन मधून बरे झालेले आहेत.

कल्याण डोंबिवलीत कोरोना रुग्णांची संख्या ५७ हजार पार १०० नवे रुग्ण तर १ मृत्यू कल्याण डोंबिवलीत कोरोना रुग्णांची संख्या ५७ हजार पार १०० नवे रुग्ण तर १ मृत्यू Reviewed by News1 Marathi on December 26, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

जिवलग मित्र परिवाराने भरली गरीब विद्यार्थांची वार्षिक फी

  डोंबिवली ( शंकर जाधव )   जिवलग मित्र परिवार डोंबिवली एमआयडीसी पूर्व च्या वतीने   ९   गरजू  विद्यार्थांची  वार्षिक फी भरुन सामजिक   बांधिलक...

Post AD

home ads