Header AD

आयएनएफएसचा नवशिक्यांकरिता ऑनलाइन बॅडमिंटन कोर्स

 मुंबई, २२ डिसेंबर २०२० : देशातील सर्वात मोठ्या फिटनेस प्रमाणीकरण संस्थांपैकी एक असलेल्या इन्स्टिट्यूट ऑफ न्युट्रिशन अँड फिटनेस सायन्सेस (आयएनएफएस)ने नाटेकर स्पोर्ट्स अँड फिटनेस यांच्या सहकार्याने बॅडमिंटनसाठी रचनात्मक ऑनलाइन कोचिंग प्रोग्राम लाँच करण्याची पूर्ण तयारी केली आहे. भारतात डिजिटल समर्थिक क्रीडा क्रांती घडवण्याचे उद्दिष्ट असलेल्या या डिजिटल कोर्समध्ये सर्वांना प्रोफेशनल कोचिंग मिळवून देईल. येथील प्रशिक्षकांकडून नवशिक्यांना अनुभव व ज्ञान मिळेल. यातून त्यांचा खेळ सुधारेल. या कोर्ससाठीची प्रवेश प्रक्रिया २२ डिसेंबरपासून सुरु झाली आहे.


डिजिटल कोर्सला प्रवेश घेतल्यानंतर, विद्यार्थ्यांना ऑनलाइन डॅशबोर्डचा अॅक्सेस मिळेल. येथे त्यांना पुढील सलग काही आठवडे ८ प्रकारचे मोड्युल्स पहायला मिळतील. हा अभ्यासक्रम अशा रितीने तयार केला आहे की, नवशिक्यांना व्हिडिओ आणि लेखी साहित्याद्वारे त्यांचे या खेळातील कौशल्य वाढवता येईल. या मोड्यूल्समध्ये हा खेळ, त्यासाठी आवश्यक असलेली साधने, वार्म-अप आणि बेसिक मूव्हमेंट ड्रिल्स, अॅडव्हान्स्ड मूव्हमेंट ड्रिल्स, गेमप्ले प्लॅन्स, रिकव्हरी आणि डायड्रेशन टिप्स इत्यादींचे संपूर्ण ज्ञान मिळेल.


आयएनएफएसच्या संस्थापक ज्योती दबस म्हणाल्या, “उत्साही लोकांना आम्ही सर्वोत्कृष्ट फिटनेस व स्पोर्ट्सचे शिक्षण देण्याचा प्रयत्न आयएनएफएसमध्ये करतो. आम्ही ऑनलाइन स्पोर्स्ट कोर्स लाँच करण्याचा विचार केला तेव्हा या क्षेत्रात हा सर्वोत्कृष्ट असणे आवश्यक आहे, याची जाणीव आम्हाला होती आणि एनएसएफची यासाठी मदत झाली. आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन कोच जोस जॉर्ज यांच्यामार्फत सादर झालेल्या या डिजिटल कोर्सचा एक फायदा म्हणजे, यात सहभागी झालेल्या खेळाडूंच्या स्वत:च्या गतीने हा खेळ शिकण्याचे स्वातंत्र्य मिळेल. "


भारताचे माजी नंबर १ टेनिसपटू गौरव नाटेकर म्हणाले, “भारतातील लोकांना खेळाबद्दल अधिक शिकवण्यासाठी मदत करणाऱ्या या आगळ्या वेगळ्या व प्रायोगिक मोहिमेत आयएनएफएससोबत भागीदारी करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. एनएसएफ संस्थेमध्ये आम्ही, ‘प्रॉफिट विथ परपज’ या गोष्टीवर विश्वास ठेवतो. या कार्याद्वारे, ज्या लोकांना स्पोर्ट्स शिकण्याची इच्छा आहे, मात्र त्यांना योग्य कोचिंग आणि मार्गदर्शन मिळत नाही, अशा लाखो भारतीयांपर्यंत पोहोचू.”

आयएनएफएसचा नवशिक्यांकरिता ऑनलाइन बॅडमिंटन कोर्स आयएनएफएसचा नवशिक्यांकरिता ऑनलाइन बॅडमिंटन कोर्स Reviewed by News1 Marathi on December 22, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

टेलगट ट्युमर सारख्या दुर्धर आजाराची शस्त्रक्रिया पहिल्या प्रयत्नात डोंबिवलीत बाज आर आर रुग्णालयात यशस्वी..संपूर्ण देशात या आजाराचे केवळ ५३ रुग्ण

  डोंबिवली ( शंकर जाधव )  जन्माला येतानाच काही जनुकीय रचनांमध्ये बदल झाल्यास भविष्यात  टेलगट ट्युमर नावाचा  दुर्मिळ आजार होण्याची शक्यता असत...

Post AD

home ads