भिवंडीत अबूबकर सिद्दीकी सोशल एज्युकेशन अँड वेल्फर सोसायटी सामाजिक संस्थेचा उपक्रम
भिवंडी , प्रतिनिधी : सध्या राज्यातील अनेक भागांसह भिवंडीत थंडी वाढत आहे. या थंडीत रस्त्यावर व दुकानांच्या पायऱ्यांवर कुडकुडत झोपणाऱ्या गरीब व गरजूंच्या अंगावर ब्लॅंकेट टाकून त्यांना मायेची ऊब देण्याचे काम शहरातील अबूबकर सिद्दीकी सोशल एज्युकेशन अँड वेल्फर सोसायटी या सामाजिक संस्थेच्यावतीने करण्यात येत आहे. संस्थेचे अध्यक्ष शोएब मोमीन यांनी रस्त्यावर थंडीत कुडकुडत झोपणाऱ्या गरिबांच्या अंगावर ब्लॅंकेट टाकून आपले सामाजिक कर्तव्य व जबाबदारी पार पाडत आहेत . शहरात थंडी सुरु झाल्यापासून आतापर्यंत शंभरहुन अधिक ब्लॅंकेटचे मोफत वाटप या संस्थेकडून करण्यात आले आहे . कुडकुडणाऱ्या थंडीत अंगावर उबदार ब्लॅंकेटची गरम उब मिळाल्याने गरीब गरजूंनी संस्थेचे आभार मानले आहेत .
अबूबकर सिद्दीकी सोशल एज्युकेशन अँड वेल्फर सोसायटी या संस्थेचे अध्यक्ष शोएब मोमीन यांनी २०१४ साली संस्थेची स्थापना केली असून सुरुवातीला या संस्थेचे नऊ सदस्य होते मात्र आता या संस्थेचे सामाजिक कार्य विस्तारल्यामुळे सुमारे ७० हून अधिक सभासद सहभागी झाले असून डॉक्टर , वकील , सीए , समाजसेवक असे विविध क्षेत्रात काम करणाऱ्या यक्ती या संस्थेच्या सभासद असून संस्थेच्यावतीने गरिबांसाठी मोफत लग्न सोहळा , धान्य व औषध वाटप , आरोग्य शिबीर असे विविध सामाजिक उपक्रम दरवर्षी राबविले जात असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष शोएब मोमीन यांनी दिली आहे. संस्थेचे सभासद सिद्दीकी मिसबहाउद्दीन, आतिफ अंसारी , रमीझ अंसारी , हुसेन अंसारी , शमशद अंसारी , सुफियान अंसारी आदी सदस्य संस्थेच्या सामाजिक कामांमध्ये नेहमीच सक्रिय सहभाग घेवून उपक्रम यशस्वी करीत आहेत .
भिवंडीत अबूबकर सिद्दीकी सोशल एज्युकेशन अँड वेल्फर सोसायटी सामाजिक संस्थेचा उपक्रम
Reviewed by News1 Marathi
on
December 03, 2020
Rating:

Post a Comment