कच्छ युवक संघ डोंबिवली शाखेच्या वतीने कच्छी जैन फाउंडेशनच्या सहकार्याने रक्तदान आणि अंगदान जागृती अभियान संपन्न
डोंबिवली , शंकर जाधव : कच्छ युवक संघ डोंबिवली शाखेच्या वतीने कच्छी जैन फाउंडेशनच्या सहकार्याने एकरवाला रक्तदान अभियान आणि अंगदान जागृती अभियान डोंबिवली पूर्वेकडील नवनीत नगर येथील कक्युनिटी सभागृहात संपन्न झाले.यावेळी सहयोगी दाता मातोश्री जवेरबेन कुशालचंद गंगर, मुख्य पाहुणे जीजेशभाई देढीया, विशेष अतिथी हितेशभाई कांतीलाल बेरीचा, भारतीबेन संघोयी ( समाजसेवक ),कच्छ युवक संघच उपप्रमुख भरतभाई गोगरी, ट्रस्टी दिलीपभाई रांभिया,कार्यवाही सदस्य धीराजभाई लालन, दिनेश सेठिया, दिनेश नागरा, डोंबिवली संयोजक राजेश मारू,सहसंयोजक चारूल मारू, ब्लड कन्वीनर पंकज करानी, सचिन सावरा, कोमलभाई छेडा,धीरजभाई छेडा,अंगदान जागृती अभियानाचे निलेश धरोड,अमिश केनिया,अंगदान कन्वीनर चिमनभाई धोसर,समाजसेवक मुकेशभाई गाला, हेंमतभाई दुल्ला, भाईलाल गाला, विशनजीभाई गाला आदी मान्यवर उपस्थित होते.सदर शिबिरात १४० रक्ताच्या पिशव्या जमा झाल्या तर ११० जणांनी अंगदान जागृती अभियानांर्गत ११० जणांनी नोंदणी केल्या.
कच्छ युवक संघ डोंबिवली शाखेच्या वतीने गेल्या १५ दिवसात के.वीरा. स्कूल, गोपाळनगर, गोग्रासवाडी आणि नवनीतनगर येथे पार पडलेल्या रक्तदान शिबिरात एकूण ५०१ रक्ताच्या पिशव्या जमा झाल्या. तर या शिबिरात २०६ जणांनी नोंदणी केल्याची माहिती राजेश मारू यांनी दिली.विशेष म्हणजे एखाद्याला रक्ताचा तुटवडा जाणवत असेल तर कच्छ युवक संघ नेहमी त्यांना सहकार्य करून मोफत रक्ताच्या पिशव्या दिल्या जातात. कच्छ युवक संघ डोंबिवली शाखेने आजवर अनेक कार्यक्रम व सामाजिक उपक्रम राबविले असून त्यामाध्यमातून गरजूंना मदत केली आहे.
कच्छ युवक संघची स्थापना १९८५ साली झाली.संघाच्या स्थापनेपासून आजवर आरोग्य शिबीर, लहान मुलांच्या आरोग्य शिबीर, महिला दिन, मॅरेथाॅन असे अनेक उपक्रम राबविले गेले. गुजरात राज्यातील कच्छ येथे कच्छ युवक संघाच्या मदतीने २२०० विद्यार्थी शिकत आहेत. कोरोना काळात कच्छ युवक संघाने अनेकांना मदत केली. कच्छ युवक संघाच्या वतीने कोरोना योद्धांचा सन्मान करण्यात आला. तर १६० कोविड प्लाझा देण्यात आले.

Post a Comment