कल्याण डोंबिवलीत १६९ नवे रुग्ण तर २ मृत्यू
■५४,७५३ एकूण रुग्ण तर १०६७ जणांचा आतापर्यंत मृत्यू तर २४ तासांत १९१ रुग्णांना डिस्चार्ज....
कल्याण , कुणाल म्हात्रे : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज नव्या १६९ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर दोन जणांचा मृत्यू झाला असून गेल्या २४ तासांत १९१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
आजच्या या १६९ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ५४,७५३ झाली आहे. यामध्ये १६४४ रुग्ण उपचार घेत असून ५२,०४२ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत १०६७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या १६९ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व- १२, कल्याण प – ५२, डोंबिवली पूर्व –६८, डोंबिवली प – २४, तर मांडा टिटवाळा – ९ तर मोहना येथील ४ रूग्णांचा समावेश आहे.
डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी २६ रुग्ण टाटा आमंत्रामधून, ५ रुग्ण पाटीदार कोविड केअर सेंटरमधून, ७ रुग्ण डोंबिवली जिमखाना कोविड रुग्णालयातून व उर्वरित रुग्ण हे इतर रूग्णालयामधून तसेच होम आयसोलेशन मधून बरे झालेले आहेत.
कल्याण डोंबिवलीत १६९ नवे रुग्ण तर २ मृत्यू
Reviewed by News1 Marathi
on
December 05, 2020
Rating:

Post a Comment