Header AD

मागील आठवड्यात सोने आणि कच्च्या तेलाचे दर वधारले डॉलर कमकुवत झाल्याचा परिणाम


 मुंबई, ७ डिसेंबर २०२० : डॉलरच्या निर्देशांकात सतत घट होत असल्याने तसेच सतत वाढणा-या कोरोना रुग्ण संख्येमुळे सोने आणि कच्च्या तेलाच्या दरात वाढ झाली असल्याचे एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे गैर कृषी वायदा व चलन संशोधन उपाध्यक्ष श्री प्रथमेश माल्या यांनी सांगितले.


सोने: मागील आठवड्यात, स्पॉट गोल्डचे दर २.८ टक्क्यांनी वधारले. तसेच डॉलर निर्देशांकात तीव्र घसरण व जगातील कोरोना रुग्णाच्या वाढत्या संख्येमुळे एमसीएक्सवरही दरात वाढ दिसून आली. अनेक देशांमध्ये लॉकडाऊनमध्ये काहीसा दिलासा मिळाला असून मध्यवर्ती बँकांकडून आधार मिळाल्याने भविष्यात सोन्याच्या दरांना आधार मिळण्याची शक्यता आहे.


अमेरिकेचे ट्रेझरी सेक्रेटरी स्टीव्हन म्युचिन आणि फेडरल रिझर्व्ह चेअरमन जेरोम पॉवेल यांनी काँग्रेसकडे कोव्हिड-१९ रिलीफ फंडच्या मंजूरीची विनंती केली आहे. तसेच सुमारे ११ दशलक्ष कामगारांना लाभ मिळत असलेल्या बेरोजगार लाभ कार्यक्रमातही तत्काळ वाढीव सुधारणा करण्याची विनंती त्यांनी काँग्रेसकडे केली. काँग्रेसच्या कोणत्याही कारवाईविना हे कार्यक्रम या महिन्याच्या अखेरीस कालबाह्य होणार आहेत.


कच्चे तेल: मागील आठवड्यात कोरोना लसीवरील संभाव्य लसीबाबत बेट्स वाढल्यामुळे, अमेरिकी क्रूड साठ्यात घसरण झाल्यामुळे तेलाच्या किंमतीत वाढ झाली. डब्ल्यूटीआय क्रूडचे दर १.६ टक्क्यांनी वाढले.


मागील आठवड्यात, ओपेक आणि रशियाने जानेवारीपासून दररोज ५००,००० बॅरल्सचे उत्पन्न घेण्याचा करार केला. त्यामुळे तेलाच्या दरात वाढ झाली. ओपेक आणि रशिया हा ग्रुप ओपेक+ म्हणून ओळखला जात असून, या समूहाने सध्याच्या ७.७ दशलक्ष बॅरल प्रतिदिन या पातळीवरून ७.२ दशलक्ष बॅरल प्रतिदिनपर्यंत उत्पादन कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकी क्रूडसाठाही -०.७ दशलक्ष झाला. तो -१.७ दशलक्ष एवढा होता. मागील पातळी -०.८ दशलक्ष एवढी होती.

मागील आठवड्यात सोने आणि कच्च्या तेलाचे दर वधारले डॉलर कमकुवत झाल्याचा परिणाम मागील आठवड्यात सोने आणि कच्च्या तेलाचे दर वधारले डॉलर कमकुवत झाल्याचा परिणाम Reviewed by News1 Marathi on December 07, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

ठाण्यातील लॉज व हॉटेलच्या अनधिकृत बांधकामांवर महापालिकेची धडक कारवाई

■अनधिकृत बांधकामावर करण्यात आलेल्या कारवाईची छायाचित्रे... ठाणे , प्रतिनिधी  :    ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या आदेशांन्वये ...

Post AD

home ads