Header AD

भिवंडी पंचायत समिती उपसभापती पदी सेनेच्या सबिया इरफान भुरे यांची बिनविरोध नियुक्ती
भिवंडी  ,  प्रतिनिधी  :  भिवंडी पंचायत समिती उपसभापती पदी शिवसेनेच्या सबिया इरफान भुरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे .भिवंडी पंचायत समिती चे उपसभापती जितेंद्र डाकी यांनी आपापसात ठरल्या प्रमाणे आपल्या उपसभापती पदाचा अवघ्या पाच महिन्यात राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या या पदासाठी तहसीलदार अधिक पाटील यांच्या अध्यासी अध्यक्षतेखाली उपसभापती निवडीच्या विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते .या वेळी सबिया इरफान भुरे या शिवसेना पक्षाच्या एकमेव उमेदवारांचा अर्ज दाखल झाल्याने त्यांच्या बिनविरोध निवडीची घोषणा केली .या प्रसंगी गटविकास अधिकारी डॉ प्रदिप घोरपडे ,पंचायत समिती सदस्य उपस्थित होते .
       

पंचायत समिती उपसभापती पदी सबिया इरफान भुरे यांची निवड होताच भिवंडी ग्रामीण आमदार शांताराम मोरे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष इरफान भुरे ,महापोली ग्रामपंचायत उपसरपंच उबेद हलबे, फरहान पटेल ,इम्रान पटेल ,शोएब कुदई ,बिलाल खलबे ,नौशाद पटेल ,रॅमिझ पटेल ,मलंग शेख यांसह समर्थक कार्यकर्त्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत .भिवंडी पंचायत समिती मध्ये  शिवसेना 20 ,मनसे 1,भाजपा 19 ,काँग्रेस 2 असे पक्षीय बलाबल असून महाविकास आघाडी कडे बहुमताचे संख्याबळ असताना भिवंडी पंचायत समिती मध्ये शिवसेना भाजपा यांच्या अंतर्गत समझोत्याने सत्ता वितरण होत असल्याने सर्वच राजकीय निरीक्षकां कडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे .
भिवंडी पंचायत समिती उपसभापती पदी सेनेच्या सबिया इरफान भुरे यांची बिनविरोध नियुक्ती भिवंडी पंचायत समिती उपसभापती पदी सेनेच्या सबिया इरफान भुरे यांची बिनविरोध नियुक्ती Reviewed by News1 Marathi on December 08, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

मनसेच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न

कल्याण , प्रतिनिधी  :   महाराष्ट्र नवनिर्माण सेना व महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना यांच्यातर्फे  गुरुवारी  कल्याण पूर्वेत कोळसेवाडी मध...

Post AD

home ads