Header AD

भिवंडीत दोन कारवाईत आठ किलो गांजासह दहा लाख रोख व दोन तलवारी जप्तभिवंडी ,  प्रतिनिधी  :  भिवंडी शहरात अमली पदार्थांचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर फैलावला असून त्यामुळे शहरातील गुन्हेगारी घटनांमध्ये मोठी वाढ झाल्याचे प्रकर्षाने जाणवत आहे. या वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी भिवंडी शहरातील  शांतीनगर पोलीस ठाणे व भिवंडी गुन्हे शाखा युनिट २ यांनी बुधवारी रात्री दोन वेगवेगळ्या कारवाईत सुमारे ८ किलो गांजा , दहा लाख रोख रक्कम व दोन तलवारी हस्तगत केल्या आहेत.एकाच दिवशी दोन कारवाया झाल्याने अमली पदार्थ विक्रीतील आरोपीं मध्ये खळबळ माजली आहे. पहिल्या गुन्ह्यात गुन्हे शाखे चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने यांना खबऱ्या मार्फत शांतीनगर भागातील गायत्री नगर येथील रिजवान खुर्शीद खान ( वय २४) याच्या घरात घातक शस्त्र ठेवल्याची माहिती मिळाल्यावर पो. उपनिरी शरद बरकडे , सहा.पो. उपनिरी रामसिंग चव्हाण ,अनिल शिरसाठ ,रविंद्र पाटील ,आर डी अल्हाट, मंगेश चौधरी ,विरेंद्र कुंभार या पोलीस पथकाने संशयित इसमाच्या घरी छापा मारला असता घरात दोन धारदार तलवारी आढळून आल्याने घराची कसून झडती घेतली असता घरात ३ किलो २५० ग्रॅम वजनाचा गांजा हस्तगत केला असून आरोपी व सदरचा गुन्हा गुन्हे शाखेने शांतीनगर पोलीस ठाण्याकडे हस्तांतरीत केला आहे .


        

 तर शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गांजा माफियांची टोळी कार्यरत असून त्यांच्या मार्फत शहरात सर्वत्र गांजा विक्री करीत असल्याची माहिती पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण यांना मिळाली असतात्यांनी पोलिसांना शहरातील अनधिकृत अमली पदार्थांच्या विक्रीस पायबंद घालण्याचा सक्त सूचना दिल्या होत्या. त्यानुसार सहाय्यक पोलीस आयुक्त प्रशांत ढोले,वरिष्ठ पो.निरीक्षक शीतल राऊत ,पो.निरीक्षक किरण कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. कैलास टोकले ,सहा.पो.उपनिरीक्षक भोला शेळके ,कर्मचारी तुषार वडे ,डी के दळवी, अमोल इंगळे,जितेंद्र पाटील ,ज्ञानेश्वर कापरे,रवि पाटील या पोलीस पथकाने शांतीनगर ,केजीएन भाजी मार्केट येथून अब्दुल कादर अब्दुल जब्बार शेख ( वय ४६ ) ,अकबर हुसेन अब्दुल अजीज शेख ( वय ४५ ) दोघे राहणार शांतीनगर यांना ताब्यात घेऊन त्यांच्या घराची झडती घेतली असता त्यांच्या जवळून ४ किलो ९७० ग्रॅम वजनाचा ४९ हजार ७०० रुपयांच्या गांजा सह रोख १० लाख २२ हजार २७० रुपये रोख रक्कम व अकरा हजार किंमतीचे दोन मोबाईल असा १० लाख ८२ हजार ९७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात शांतीनगर पोलीस यशस्वी झाले आहेत.भिवंडी शहरात शांतीनगर भागात एकाच दिवशी शांतीनगर पोलीस व भिवंडी गुन्हे शाखा युनिट २  या दोन्ही पोलीस ठाण्यांनी कारवाई करीत तब्बल ८ किलो गांजा जप्त करण्यात यश मिळवले आहे. त्यामुळे शहरातील अमली पदार्थ विक्री व्यवसायातील गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत .तर शहरात अमली पदार्थ विक्री बाबत नागरीकांनी पुढे येऊन तक्रारी कराव्यात पोलीस त्यांची तात्काळ दाखल घेऊन कारवाई करतील अशी माहिती पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण यांनी दिली आहे

भिवंडीत दोन कारवाईत आठ किलो गांजासह दहा लाख रोख व दोन तलवारी जप्त भिवंडीत दोन कारवाईत आठ किलो गांजासह दहा लाख रोख व दोन तलवारी जप्त Reviewed by News1 Marathi on December 03, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

मागासवर्गीयांच्या पदोन्नती मधील आरक्षणा साठी राज्य पालांनी हस्तक्षेत करावा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

■ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाच्या  शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट मुंबई दि...

Post AD

home ads