पालीकेची शाळा पुन्हा एकदा भाडेतत्वावर देण्याचा घाट
■सामाजिक कार्यकर्त्याने आक्षेप घेत दिला आंदोलनाचा इशारा....
कल्याण , कुणाल म्हात्रे : कल्याण डोंबिवली महापालिकेच्या शिक्षण मंडळाने पट संख्या घसरलेल्या शाळा भाडे तत्वावर देण्याचा घाट घातला आहे. विशेष म्हणजे याआधी हा प्रस्ताव दोन वेळा फेटाळला असतांना आता पुन्हा हि शाळा भाड्याने देण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. मोहने येथील शाळा क्रमांक ३१ कै शांताराम महादू पाटील ही शाळा महापालिकेच्या शिक्षण मंडळाकडून भाडेतत्वावर देण्याचा घाट घालण्यात आला आहे. मोहने येथील समाजिक कार्यकर्ता रवी गायकवाड यांनी या प्रकियेला विरोध केला आहे.
कल्याण डोंबिवली महानगरपालिका शाळा क्र.३१ मोहणे शांताराम महादू पाटील या शाळेची जागा ही कै.शांताराम महादू पाटील यांनी परिसरातील गोरगरीब व दलित मागासवर्गीय मुला मुलींना शिक्षणाची सोय होण्या करिता १९७५ साली दान रूपात ग्रामपंचायतीला २० गुंठे जागा दान दिली होती. तरी आज त्या शाळेत १ ते ८वी १०० च्या वर दलित व मागासवर्गीय मुलं शिक्षण घेत आहेत. परंतु लोकप्रतीनिधी प्रशासन अधिकारी, विस्तार अधिकारी यांच्या आर्थिक देवाण घेवाणीतून सुरळीत चालू असलेली शाळा ही कायम विनाअनुदानित तत्वावर व स्वतच्या मालकीची १ वर्ग खोलीही अस्तीत्वात नसलेल्या व महापालिका विस्तार अधिकारी जगदाळे यांच्या पत्नी विश्वस्त असलेल्या यशोदीप विद्यालय या शाळेत समयोजित करण्यास परिसरातील नागरिकांचा सक्त विरोध आहे.
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील शाळा क्र.३१ ही या अगोदर दोन वेळा समायोजित करण्याचा प्रस्ताव तत्कालीन आयुक्त ई रवींद्रन व गोविंद बोडके यांनी फेटाळून लावला होता, तरी परिसरातील नागरिकांचा विरोध असताना व राजकीय दबावापोटी समयोजित करण्याचा प्रयत्न झाल्यास परिसरातील झोपडपट्टी व दलित व मागासवर्गीय मुलांना त्यांच्या शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न झाल्यास त्या विरोधात प्रशासन अधिकारी, विस्तार अधिकारी व यशोदीप विद्यालय संस्थाचालक व जेजे प्रशासनातील अधिकारी महापालिका शाळा समयोजित करण्यास शामिल असतील त्यांच्या विरोधात अनुसूचीत जाती जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार व लाचलुचपत कायद्या अंतर्गत व न्यायालयात दाद मागणार असल्याचे गायकवाड यांनी सांगतिले.
तर शासनाच्या निर्देशांनुसार ज्या शाळेची पट संख्या २० च्या वर आहे ती शाळा बंद करता येत नाही, त्यानुसार हि शाळा बंद अथवा भाडे तत्ववर देण्यात येवू नये अशी मागणी गायकवाड यांनी केली असून त्यानंतर हि शाळा भाडे तत्वावर दिल्यास लोकशाही मार्गाने जनआंदोलन केल जाईल अशा इशारा गायकवाड यांनी दिला आहे.

Post a Comment