Header AD

राष्ट्रवादी अर्बन सेलच्या प्रविण मुसळे यांनी केली देशी ८० रोपांची लागवड शरद पवार यांच्या ८० व्या वाढदिवसा निमित्त उपक्रम




कल्याण, कुणाल  म्हात्रे  :  राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या ८० व्या वाढदिवसाचे औचित्य साधून कल्याणमध्ये राष्ट्रवादी अर्बन सेलचे महाराष्ट्र प्रदेश सदस्य प्रविण मुसळे यांच्या वतीने देशी  ८० रोपांची लागवड करण्यात आली.

कल्याण पश्चिम परिसरातील महापालिकेचे गार्डन व हौऊसिंग सोसायटीस मध्ये हा सामाजिक उपक्रम करण्यात आला. या सामाजिक उपक्रमात श्री खोपडे, विसपुते, मुसळे, दांडवेकर, काळे, चौधरी, संदीप वाकचौरे, मंगेश वाकचौरे, बलवंत खंडेलवाल, स्टॅनली डिमेलो, समृध्दि, संस्कृती, अधिरा आणि अधिराज आदींचे सहकार्य लाभले.


सामाजिक कार्याद्वारे शरद पवार यांचा वाढदिवस साजरा व्हावा आणि समाजाला काहीतरी याचा फायदा व्हावा या उद्देशाने या ८० रोपांची लागवड करण्यात आली असून या रोपांची निगा राखण्यात येऊन या रोपांची मोठी वृक्ष झाल्यास पर्यावरणाचा समतोल राखला जाऊन नागरिकांनाच याचा फायदा होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी अर्बन सेलचे महाराष्ट्र प्रदेश सदस्य प्रविण मुसळे यांनी दिली.

राष्ट्रवादी अर्बन सेलच्या प्रविण मुसळे यांनी केली देशी ८० रोपांची लागवड शरद पवार यांच्या ८० व्या वाढदिवसा निमित्त उपक्रम राष्ट्रवादी अर्बन सेलच्या प्रविण मुसळे यांनी केली देशी ८० रोपांची लागवड शरद पवार यांच्या ८० व्या वाढदिवसा निमित्त उपक्रम  Reviewed by News1 Marathi on December 15, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

टेलगट ट्युमर सारख्या दुर्धर आजाराची शस्त्रक्रिया पहिल्या प्रयत्नात डोंबिवलीत बाज आर आर रुग्णालयात यशस्वी..संपूर्ण देशात या आजाराचे केवळ ५३ रुग्ण

  डोंबिवली ( शंकर जाधव )  जन्माला येतानाच काही जनुकीय रचनांमध्ये बदल झाल्यास भविष्यात  टेलगट ट्युमर नावाचा  दुर्मिळ आजार होण्याची शक्यता असत...

Post AD

home ads