आय.एम. ए च्या विविध मागण्यांसाठी ठाणे कोर्ट नाका येथे डॉक्टरांचे आंदोलन
ठाणे , प्रतिनिधी : इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने ठाण्यातील कोर्ट नाका येथे डॉक्टरांकडून निदर्शने करण्यात आली. आयुर्वेद विद्यार्थ्यांना ॲलोपॅथिक शस्त्रक्रियांची परवानगी केंद्र सरकारने दिलीय. आणि याच्याच निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले. दरम्यान सीआयएची अधिसूचना मागे घेण्यात यावी, राष्ट्रीय वैद्यकीय परिषदेने तयार केलेल्या चार समिता त्वरित रद्द करण्यात याव्यात. यासह वैद्यकीय शाखांची सरळ मिसळ करण्याऐवजी प्रत्येक शाखेचा वेगळा विकास करून जनतेला त्याचा जास्तीत जास्त उपयोग कसा होईल, यावर सरकारने भर द्यावा. या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं.
आय.एम. ए च्या विविध मागण्यांसाठी ठाणे कोर्ट नाका येथे डॉक्टरांचे आंदोलन
Reviewed by News1 Marathi
on
December 11, 2020
Rating:

Post a Comment