Header AD

एमजी मोटर इंडियाद्वारे नोव्हेंबरमध्ये ४१६३ कार विक्रीची नोंद


■आत्तापर्यंतची सर्वाधिक विक्री; गेल्या वर्षीच्या तुलनेत २८.५% वाढ...


मुंबई, २ डिसेंबर २०२० : एमजी मोटर इंडियाने नोव्हेंबर २०२० महिन्यात ४१६३ कार विक्री झाल्याचे नोंदविले आहे. ही वाढ गेल्या वर्षातील याच महिन्याच्या तुलनेत २८.५% ने झाली आहे. एमजी हेक्टर ही भारताची पहिली इंटरनेट कार असून नोव्हेंबर २०२० या महिन्यात या कारची किरकोळ विक्री एकूण ३४२६ इतकी झाली आहे. लॉन्च झाल्यापासून ही दुसरी सर्वाधिक मासिक विक्री आहे. वर्षापूर्वी याच काळाच्या तुलनेत विक्रीतील वाढ ६% आहे. हेक्टरने या महिन्यात ४००० नवीन ऑर्डर्स मिळवून विकासाची घोडदौड कायम राखली आहे.


ग्लॉस्टर ही भारतातील पहिली ऑटोनॉमस लेवल १ प्रीमियम एसयूव्ही असून पाहिल्याच महिन्यात या ६२७ युनिट्स विक्री झाली. आत्तापर्यंत २५०० पेक्षा जास्त बुकिंग करून जनतेने या गाडीला चांगला प्रतिसाद दिला आहे. संपूर्णपणे इलेक्ट्रिक गाडी एमजी झेडएस इव्हीच्या ११० कार नोव्हेंबर महिन्यात विकल्या गेल्या.


एमजी मोटर इंडियाचे विक्री संचालक राकेश सिदाना म्हणाले, “हेक्टर आणि झेडएस इव्हीसाठी सणासुदीच्या मोसमातील वाढती मागणी आणि एमजी ग्लॉस्टरचे यशस्वी लॉन्चिंग यांच्या मदतीने आम्ही नोव्हेंबर २०२० या महिन्यात मागच्या वर्षाच्या तुलनेत २८.५% वृद्धी नोंदवली आहे. विक्रीला मिळालेली ही चालना डिसेंबर महिन्यातही चालू राहील आणि ह्या वर्षाचा समारोप आम्ही या सशक्त संदेशाने करू अशी आम्हाला आशा आहे.”


एमजी हेक्टरमध्ये २५+ आधुनिक सुरक्षा फीचर्स सरसकट आहेत आणि काही विशेष फीचर्स आहेत तसेच या सेग्मेंटच्या गाड्यांच्या तुलनेत मेंटेनन्सचा खर्च कमी असण्याचे वचन ही गाडी देते. या कार-निर्मात्या कंपनीने हायटेक इलेक्ट्रिक कारची मागणी वाढण्याचा अंदाज घेऊन अलीकडेच आपल्या झेडएस इव्हीच्या विक्रीचा आवाका २५ शहरांपर्यंत नेला आहे.

एमजी मोटर इंडियाद्वारे नोव्हेंबरमध्ये ४१६३ कार विक्रीची नोंद एमजी मोटर इंडियाद्वारे नोव्हेंबरमध्ये ४१६३ कार विक्रीची नोंद Reviewed by News1 Marathi on December 02, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

कोव्हिड-१९ पीडितांसाठी एमजीच्या ग्राहकांनी उभारला निधी

■ बायोडिग्रेडेबल बेडशीट केल्या दान; उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले उपक्रमाचे कौतुक ..   महाराष्ट्र, १८ मे २०२१ :  एमजी मोटर इंडियाने पुण...

Post AD

home ads