Header AD

डॉक्टरांच्या संपात नीमाचा सहभाग नाही गुलाबी फीत लावून केले काम

  

 
डोंबिवली , शंकर जाधव   :   केंद्र सरकारच्या सेंट्रल कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसनने आयुव्रेदीक डॉक्टरांना ५८  शस्त्रक्रिया करण्यास परवानगी दिली आहे. या निर्णयाचा इंडियन मेडिकल असोसिएशनने शुक्रवारी काम बंद केले असले तरी या संपामध्ये नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशनने (नीमा) सहभागी घेतला नाही. नीमा संघटनेच्या सर्व डॉक्टर गुलाबी फीत लावून काम केले.

    


नीमाच्या डॉक्टरांनी आयएमएच्या सर्व दावे फेटाळून लावले असून केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे देशातील शल्यचिकित्सकांची कमतरता भरून निघण्यासह ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेला बळकटी मिळणार असल्याचे नीमाच्या कल्याण विभागाचे अध्यक्ष डॉ.अनिल पाटील यांनी सांगितले. आचार्य सुश्रुत यांना सर्व चिकित्सा पध्दतीमध्ये शस्त्रक्रियेचे पितामह म्हणून ओळखले जाते.सुश्रुताचार्य यांनी वर्णन केलेल्या विविध शस्त्रक्रिया तसेच त्यांचे पूर्व आणि पश्चातकर्माचा गेल्या ४० वर्षापासून शल्य तसेच शलाक्यतंत्रतील पदव्युत्तर शिक्षणामध्ये अंतर्भाव आहे. इतकेच नव्हे तर काळानूरूप आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत आवश्यक ते बदल स्विकारत देशातील आणि महाराष्ट्रातील विविध आयुव्रेदीय शिक्षण संस्थामध्ये यशस्वीपणो केल्या जात असल्याची माहिती नीमाच्या कल्याण विभागाचे अध्यक्ष डॉ.पाटील यांनी दिली आहे. केंद्र सरकारच्या निर्णयामुळे ग्रामीण भागात शस्त्रक्रियासारखी महत्त्वाची आरोग्य सेवा उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.मात्र इंडियन मेडिकल असोसिएशन यासंदर्भात गुणवत्ता आणि प्रशिक्षणाच्या नावाखाली प्रश्न विचारत लोकांमध्ये संभ्रम निर्माण करत असल्याचा आरोप नीमा संघटनेने केला आहे. दरम्यान आयएमएच्या बंदमध्ये नीमा संघटनेचे डॉक्टर सहभागी झाले नाहीत.निमा संघटनेच्या डॉक्टर्सने गुलाबी फीत लावून काम केले.तर हा निर्णय घेतल्याबद्दल केंद्र सरकारचे अभिनंदन करणारे पत्र तहसीलदारांना दिले.भूलतज्ञ आणि क्षयकिरण तज्ञ,रेडीओलॉजिस्ट यांनाही सुरक्षितरित्या व्यवसाय करण्यासाठी कायद्याचा आधार द्यावा. आयुर्वेदिक डॉक्टरामुळे ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य व्यवस्था सुरळीत होऊ शकते असे नीमाच्या कल्याण विभागाचे अध्यक्ष डॉ.अनिल पाटील यांनी सांगितले.

डॉक्टरांच्या संपात नीमाचा सहभाग नाही गुलाबी फीत लावून केले काम डॉक्टरांच्या संपात नीमाचा सहभाग नाही  गुलाबी फीत लावून केले काम Reviewed by News1 Marathi on December 11, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

मुख्य अग्निशमन अधिकारी दिलीप गुंड यांच्या ध्येयपूर्ती पुस्तकाचे आयुक्तांच्या हस्ते प्रकाशन

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :   दिलीप  गुंड यांचे "ध्येयपूर्ती" हे पुस्तक ग्रामीण भागातील प्रत्येक तरुणाला आशादायी व प्रेरणादायी असे...

Post AD

home ads