रणजितसिंह डिसले सर यांचा सत्कार ठामपाच्या वतीने करण्यात यावा अशी मागणी नगरसेविका शर्मिला पिंपळोलकर यांनी महापौर नरेश म्हस्के यांच्या कडे पत्राद्वारे केली आहे.
ठाणे, प्रतिनिधी : ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणासाठी महत्त्वाची भूमिका बजावण्याऱ्या रणजितसिंह डिसले यांना यंदाचा ग्लोबल टीचर पुरस्कार मियाळाला आहे. हा पुरस्कार मिळवणारे डिसले हे पहिले भारतीय शिक्षक ठरले आहेत.युनेस्को आणि लंडनमधल्या वार्की फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी ग्लोबल टीचर पुरस्कार देण्यात येतो.
सोलापूर जिल्ह्यातल्या माढा तालुक्यातील परितेवाडीच्या जिल्हा परिषद शाळेत डिसले प्राथमिक शिक्षक म्हणून काम करतात. त्यांच्या ह्याच चांगल्या कामामुळे ठाणे महानगर पालिकेच्या वतीने सत्कार करण्यात यावा अशी मागणी कोपरी प्रभाग क्रमांक20 च्या शिवसेना नगरसेविका शर्मिला पिंपळोलकर यांनी केली आहे.

Post a Comment