भिवंडीत जागतिक दिव्यांग दिन साजरा
भिवंडी , प्रतिनिधी : भिवंडीतील नाकोडा कर्ण बधिर विद्यालय येथे नुकताच पार पडलेला जागतिक दिव्यांग दिन भैरव सेवा समिती यांच्या माध्यमातून साजरा करण्यात आला. भिवंडीतील एकमेव कर्ण बधिर मुलांसाठी असलेल्या नाकोडा विद्यालयात दिव्यांग विद्यार्थ्यांना जागतिक दिव्यांग दिनानिमित्त शैक्षणिक साहित्य देऊन त्यांना गौरविण्यात आले.
यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना त्यांच्या समस्या आणि अडीअडचणी समजून घेऊन त्यावर त्यांना मार्गदर्शन करण्यात आले.तसेच येथील विशेष शिक्षकांनी आणि मुख्याध्यापक यांनी उपस्थित दिव्यांग मुलांना शारीरिक आरोग्य आणि मानसिक आरोग्य यावर समुपदेशन केले.दिव्यांग मुलांच्या पालकांना दिव्यांग मुले जन्माला येऊ नये या दृष्टीने दिव्यांगत्व प्रतिबंध,शीघ्र निदान आणि उपचार आणि दिव्यांग मुलांसाठी योजना,हक्क आणि खाजगी कंपन्यामध्ये नोकरी यावर मार्गदर्शन केले.यावेळी भैरव सेवा समिती खजिनदार अनिल जैन,अमित छाजेर,सुरेंद्र गोगड नाकोडा विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अश्विनी दुनगे आदी उपस्थित होते.
भिवंडीत जागतिक दिव्यांग दिन साजरा
Reviewed by News1 Marathi
on
December 09, 2020
Rating:

Post a Comment