Header AD

रिक्षाचालकांना १० हजार रुपये आर्थिक मदत देण्याची मुख्यमंत्र्याकडे मागणी कल्याण रिक्षा टॅक्सी संघर्ष कृती समिती आक्रमक
कल्याण , कुणाल म्हात्रे : कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे रिक्षाचालक उध्वस्त झाले असून रिक्षा चालकांची आर्थिक घडी बसविण्यासाठी शेतकरी आणि नाका कामगारांप्रमाणे रिक्षा चालकांना देखील सरकारने १० हजार रुपयांची आर्थीक मदत देण्याची मागणी कल्याण रिक्षा टॅक्सी संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष विलास गायकवाड यांनी  मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.


       कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर केंद्र व महाराष्ट्र शासनाने लॉकडाऊन जाहीर केल्याने हातावर पोट असलेल्या रिक्षाचालकांचे उत्पन्न बुडून दैनावस्था झाली आहे. यानंतर येणारी आर्थिक मंदी रिक्षाचालकांसाठी भीषण असणार असून त्याचा सामना करण्यासाठी आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी दरमहा १० हजार रुपये आर्थिक मदत करण्यात यावी. रिक्षा खरेदीसाठी घेतलेले कर्ज व त्यावरील व्याज माफ करण्यात यावे. ऑटोरिक्षा टॅक्सी चालक मालक स्वयंरोजगार कल्याणकारी मंडळ तातडीने गठन करण्यात यावे. रिक्षाचालक दरवर्षी ८ हजार रुपये इन्शुरन्स भरतात मात्र त्याचा क्लेम होत नाही. ९९ टक्के रिक्षा चालकांना त्याचा क्लेम मिळत नाही. त्यामुळे याच पैशातून रिक्षाचालकांसाठी पेन्शन योजना सुरु करावी. रिक्षा चालकांना निमशासकीय चालकांचा दर्जा मिळावा आदी मागण्या कल्याण रिक्षा टॅक्सी संघर्ष कृती समितीने मुख्यमंत्र्यांकडे केल्या आहेत.


       या मागण्यांसाठी कल्याण डोंबिवलीमधून सुमारे १० हजार रिक्षाचालक वैयक्तिकरित्या अर्ज भरून कल्याण रिक्षा टॅक्सी संघर्ष कृती समितीच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना देणार आहेत. या कृती समितीमध्ये सर्वपक्षीय रिक्षा संघटना सहभागी झाल्या आहेत. या अर्जांचे आजपासून रिक्षाचालकांना वितरण करण्यात आले आहे. यावेळी समितीचे अध्यक्ष विलास गायकवाड, सचिव राहुल वारे, उपाध्यक्ष निलेश व्यवहारे, मनोज दिवेकर, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर सोनावणे, सहसचिव सदाशिव सोनावणे, खजिनदार विल्सन काळपुंड, मल्हारी गायकवाड, महेश राउत, अरविंद अंगारखे आदी पदाधिकारी उपस्थित होते.           


रिक्षाचालकांना १० हजार रुपये आर्थिक मदत देण्याची मुख्यमंत्र्याकडे मागणी कल्याण रिक्षा टॅक्सी संघर्ष कृती समिती आक्रमक रिक्षाचालकांना १० हजार रुपये आर्थिक मदत देण्याची मुख्यमंत्र्याकडे मागणी कल्याण रिक्षा टॅक्सी संघर्ष कृती समिती आक्रमक Reviewed by News1 Marathi on December 27, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

टेलगट ट्युमर सारख्या दुर्धर आजाराची शस्त्रक्रिया पहिल्या प्रयत्नात डोंबिवलीत बाज आर आर रुग्णालयात यशस्वी..संपूर्ण देशात या आजाराचे केवळ ५३ रुग्ण

  डोंबिवली ( शंकर जाधव )  जन्माला येतानाच काही जनुकीय रचनांमध्ये बदल झाल्यास भविष्यात  टेलगट ट्युमर नावाचा  दुर्मिळ आजार होण्याची शक्यता असत...

Post AD

home ads