Header AD

वाहतूक पोलिसांवर हात उचलणाऱ्या दुचाकी स्वाराला नागरिकांनी दिला चोप पोलिसांनी केली अटक
डोंबिवली ,  शंकर जाधव   :  नो इंट्रीत मोटरसायकल चालवणाऱ्या तरुणाला अडविण्याच्या प्रयत्न करणाऱ्या वाहतूक पोलिसावर हात उचलणाऱ्या तरुणाला नागरिकांनी पाठलाग करून चांगलाच चोप दिला.घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तरुणाला अटक केली.ही घटना शुकवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास डोंबिवली पूर्वेकडील मंजुनाथ शाळेसमोर घडली.डोंबिवली शहरात वाहतूक पोलीस आपले काम चोख बजावत असताना वाहतूक नियम मोडणाऱ्या अश्या वाहनचालकांवर कडक कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली.तर दिवसरात्र काम करणाऱ्या वाहतूक पोलिसांच्या कामकाजावर नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.


देवराज नाडा ( २६, पेंडसेनगर, डोंबिवली पूर्व ) असे वाहतूक पोलिसावर हात उचलणाऱ्या दुचाकीस्वराचे नाव आहे.तर वाहतूक पोलीस कर्मचारी शंकररावजी कडू यांच्या फिर्यादीवरून रामनगर पोलीस ठाण्यात देवराजवर गुन्हा दाखल नोंदविण्यात आला आहे.पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार डोंबिवली पुर्वेकडील मंजुनाथ शाळेजवळील नो इंट्रीत देवराजने मोटरसायकलवरून जात होता. वाहतूक नियमाचे उलंघ्घन करणाऱ्या देवराजच्या मोटरसायकलचा नंबर घेण्यासाठी वाहतूक पोलीस कर्मचारी कडू यांनी आपल्या मोबाईलवरून फोटो काढण्याचा प्रयत्न केला. मात्र देवराजने मोटरसायकलवरून पळ काढला.काही क्षणातच देवराज सदर ठिकाणी आला.


वाहतूक पोलीस कर्मचारी कडू यांना शिवीगाळ करून त्याच्यावर हात उचलला.हा प्रकार घडत असताना नागरिकांनी पहिले.भररस्त्यात वाहतूक पोलिसावर हात उचलल्याचे पाहून नागरिकांनी देवराजला पकडण्याचा प्रयत्न केला. आपण पकडलेले जाणार या भीतीने देवराज पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. मात्र नागरिकांनी देवराजचा पाठलाग करून त्याला पकडून चोप दिला. सदर घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी वाहतूक पोलीस आणि रामनगर पोलीस दाखल झाले. नागरिकांनी पडकून ठेवलेल्या देवराजला पोलिसांनी पकडून पोलीस ठाण्यात आले. देवराजवर १८६ कलमान्वये ( सरकारी कामात अडथळा ) गुन्हा दाखल केला आहे.

वाहतूक पोलिसांवर हात उचलणाऱ्या दुचाकी स्वाराला नागरिकांनी दिला चोप पोलिसांनी केली अटक वाहतूक पोलिसांवर हात उचलणाऱ्या दुचाकी स्वाराला नागरिकांनी दिला चोप पोलिसांनी केली अटक Reviewed by News1 Marathi on December 12, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

ठाण्यातील लॉज व हॉटेलच्या अनधिकृत बांधकामांवर महापालिकेची धडक कारवाई

■अनधिकृत बांधकामावर करण्यात आलेल्या कारवाईची छायाचित्रे... ठाणे , प्रतिनिधी  :    ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या आदेशांन्वये ...

Post AD

home ads