आले साखरपुडा कार्य क्रमासाठी उरकले लग्न !कोरोना भीती सरली तरी मोजक्या कुटुंबियांच्या उपस्थितीत पार पडला भिवंडीत आदर्श विवाह,
भिवंडी , प्रतिनिधी : कोरोना काळात गर्दी एकत्रित करून सार्वजनिक कार्यक्रम करण्यावर बंदी आलेली असताना अनेक विवाह अवघ्या हाताच्या बोटावर मोजता येईल एवढ्यांच्या उपस्थितीत पार पडले तर आता कोरोना संसर्ग निवळत असल्याने नागरीक ही बेफिकीर होऊन फिरत आहेत.नव्हेच तर विवाह सोहळे गर्दीत साजरे होत असताना काहींच्या मनातील कोरोना ची भीती आज ही कमी झालेली नाही त्यामुळे सर्वत्र सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये गर्दीवर बंदी आलेली असल्याचा विचार करून भिवंडी मध्ये साक्षीगंधासाठी आलेल्या मंडळींनी आपसात बैठक करून साक्षीगंध सोहोळ्यामध्येच आदर्श विवाह सोहळा पार पडल्याची घटना भिवंडी मध्ये घडली आहे.
भिवंडीतील बी एन एन महाविद्यालयात मराठी विषयाचे प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले प्रा राजेंद्र डोंगरदिवे यांची कन्या क्षितिजा हिचा साक्षीगंध बुलढाणा जिल्यातील खामगाव येथील रहिवाशी असलेले विजय नारायण महाले यांचे सुपुत्र विशाल यांच्यासोबत निश्चित झाले होते . त्या निमित्त काही मोजके कुटुंबीय साक्षीगंध (साखरपुडा) कार्यक्रमा साठी भिवंडी येथे आले असता इमारतीच्या टेरेस वर त्यासाठी छोटेखानी सजावट मंडप उभारण्यात आला होता.
साक्षीगंध कार्यक्रमा साठी आलेल्या महाले कुटुंबियांनी सदरची आरास पाहता ते भारावून गेले, व त्यांच्या मनात आले की आपण या संस्कार मंचावर मंगल परिणय का करू नये? असा प्रस्ताव डोंगरदिवे कुटुंबियांसमोर मांडला, त्यानंतर महाले आणि डोंगरदिवे यांचेकडील नातेवाईकांमध्ये सांगोपांग चर्चा विनिमय होऊन सध्याची कोरोना सदृश परिस्थिती पाहता साक्षीगंधा सोबतच आदर्श विवाह संपन्न करण्यात आला, सदरचा आदर्श विवाह पार पाडण्याचे काम बौधाचार्य संतोष चव्हाण यांनी केले.
एकीकडे लाखो रुपये खर्च करून पैशांची उधळण करणारांना ही चपराक असून समाजामध्ये सामाजिक संदेश मिळावा म्हणून नवदाम्पत्यानी आणि त्यांच्या पालकांनी घेतलेल्या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे, या नवनिवाहित जोडप्याचा आणि त्यांच्या पालकांचा सर्वांनीच आदर्श घ्यावा असे बौधाचार्य संतोष चव्हाण यांनी बोलताना सांगितले.
आले साखरपुडा कार्य क्रमासाठी उरकले लग्न !कोरोना भीती सरली तरी मोजक्या कुटुंबियांच्या उपस्थितीत पार पडला भिवंडीत आदर्श विवाह,
Reviewed by News1 Marathi
on
December 21, 2020
Rating:

Post a Comment