Header AD

मालमत्ता कराच्या स्टॅम्प ड्युटीवर देण्यात आलेल्या सवलतीस मार्चपर्यंत मुदतवाढ देण्याची आमदार रईस शेख यांची मागणी


 


भिवंडी ,  प्रतिनिधी  :  कोविड - १९ रोगाच्या साथीचा प्रसार होत असताना जनजीवनासह अर्थव्यवस्था देखील विस्कळीत झाली असून अद्यापही महामारीचे वातावरण चालूच आहे. त्यामुळे आजही अर्थव्यवस्था पूर्णपणे सुधारलेली नाही. जनजीवन आणि अर्थव्यवस्था मार्गावर आणण्यासाठी राज्य शासनाने बऱ्याच महत्वाच्या उपाययोजना लागू केल्या असून या उपाययोजनांचा नागरीकांसोबतच व्यवसायिकांना देखील उपयोग झाला आहे. विशेष म्हणजे शासनाकडून कोविड१९ रोगाच्या महामारीच्या पार्श्वभूमीवर मालमत्ता खरेदीच्या स्टॅम्प ड्युटीवर सूट देण्यात आली आहे. ५% असणाऱ्या स्टॅम्प ड्युटीवर ३% सूट देवून केवळ २% स्टॅम्प ड्युटी सध्या आकारण्यात येत आहे.


त्यामुळे नागरिकांना त्याचा चांगलाच लाभ झालेला असून बांधकाम व्यवसायावर त्याचे चांगले परिणाम झाल्याने व्यवसायिकांसोबतच बांधकाम मजूर व कामगारांना कामे मिळण्याबाबत फायदा झालेला आहे. परंतू या सूटचा कालावधी केवळ डिसेंबर २०२० पर्यंतच लागू करण्यात आलेला आहे. त्यामुळे नागरिकांच्या आणि अर्थव्यवस्थेच्या हितावह मालमत्ता खरेदीच्या स्टॅम्प ड्युटीवर देण्यात आलेली ३ टक्के सूट आर्थिक वर्ष २०२०-२१ संपेपर्यंत म्हणजेच ३१ मार्च २०२१ पर्यंत लागू करून मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
मालमत्ता कराच्या स्टॅम्प ड्युटीवर देण्यात आलेल्या सवलतीस मार्चपर्यंत मुदतवाढ देण्याची आमदार रईस शेख यांची मागणी मालमत्ता कराच्या स्टॅम्प ड्युटीवर देण्यात आलेल्या सवलतीस मार्चपर्यंत मुदतवाढ देण्याची आमदार रईस शेख यांची मागणी Reviewed by News1 Marathi on December 08, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

ठाण्यातील लॉज व हॉटेलच्या अनधिकृत बांधकामांवर महापालिकेची धडक कारवाई

■अनधिकृत बांधकामावर करण्यात आलेल्या कारवाईची छायाचित्रे... ठाणे , प्रतिनिधी  :    ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या आदेशांन्वये ...

Post AD

home ads