भिवंडी महानगरपालिकेत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
भिवंडी, प्रतिनिधी : भारतीय घटनेचे शिल्पकार,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 64 व्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने पालिकेत स्थायी समिती सभापती हलीम अन्सारी यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी शहर अभियंता लक्ष्मण गायकवाड, शिक्षण विभाग प्रशासन अधिकारी सुभाष झळके,प्रभाग समिती क्रमांक 5 चे सहायक आयुक्त सुधीर गुरव,प्रभाग समिती क्रमांक 4 चे सहायक आयुक्त सुनील झळके,प्रभाग समिती क्रमांक 5 चे सहायक आयुक्त सुनील भोईर, अग्निशमन अधिकारी राजेश पवार,जनसंपर्क अधिकारी मिलिंद पळसुले,ग्रंथपाल डॉ.बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाचे तेजराव तायडे , प्रभाग समिती क्रमांक 1 चे कार्यलय अधीक्षक मकासुम्म शेख,उपस्थित होते.मुख्यालयातील मुख्य कार्यक्रमानंतर मनपा जुने मुख्यालय व डॉ.बाबासाहेब आंबेडकर वाचनालय तसेच अंजुर फाटा येथील बाबासाहेब यांचे अर्ध पुळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

Post a Comment