Header AD

आमदारच्या गाडीच्या अपघातात दोन जणांच्या मुत्यु प्रकरणी वाहन चालकाची जामिनावर मुक्तता

                                                कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  कल्याण तालुका ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत रविवारी दहागाव जवळ भाजप आमदार किसन कथोरे यांच्या गाडीने एका दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार एक तरुण आणि एका तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. टिटवाळा ग्रामीण पोलिसांनी याप्रकरणी आरोपी कार चालकांस अटक करीत सोमवारी कल्याण जिल्हा सत्र नान्यालयात हजर केले असता जामिनावर मुक्तता करण्यात आली.      

                                             

रविवारी संध्याकाळच्या सुमारास दहागाव नजीक आमदार किसन कथोरे यांच्या कार आणि मोटारसायकलच्या धडकेत कल्याण मधील पिसवली परिसरात राहणारा अमित नंदकुमार सिंग आणि  त्यांच्या सबोत असलेली तरूणी सिमरन सिंग या दोघांचा भीषण अपघातात मुत्यु झाला.  पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार,  टिटवाळा पोलिसांनी कार चालक  किरण भोपी वय (२९) वर्षे यांस अपघात प्रकरणी अटक करीत सोमवारी कल्याण  जिल्हा सत्र नान्यालयात हजर केले असता न्यायायाने जमिनावर मुक्तता केली.


आमदारच्या गाडीच्या अपघातात दोन जणांच्या मुत्यु प्रकरणी वाहन चालकाची जामिनावर मुक्तता आमदारच्या गाडीच्या अपघातात दोन जणांच्या मुत्यु प्रकरणी वाहन चालकाची जामिनावर मुक्तता       Reviewed by News1 Marathi on December 14, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

टेलगट ट्युमर सारख्या दुर्धर आजाराची शस्त्रक्रिया पहिल्या प्रयत्नात डोंबिवलीत बाज आर आर रुग्णालयात यशस्वी..संपूर्ण देशात या आजाराचे केवळ ५३ रुग्ण

  डोंबिवली ( शंकर जाधव )  जन्माला येतानाच काही जनुकीय रचनांमध्ये बदल झाल्यास भविष्यात  टेलगट ट्युमर नावाचा  दुर्मिळ आजार होण्याची शक्यता असत...

Post AD

home ads