Header AD

कल्याण ग्रामीण राष्ट्रवादीच्या बैठकीत शिवसेनेवर नाराजी

 डोंबिवली, शंकर जाधव  :  २०१५ साली केडीएमसीत २७ गावे समाविष्ट करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला संघर्ष समितीने कडाडून व विरोध केला होता.गावातील निवडणुकी बहिष्कार टाकण्याचा एकमताने निर्णय झाल्याने घेण्यात आला.मात्र शिवसेनेने आपले उमेदवार गावातून उभे केल्याने संघर्ष समितीने शिवसेनेच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली होती. आता महाविकास आघाडी सरकार असल्याने यावेळी शिवसेना गावाच्या बाजूने निर्णय घेतील असा विश्वास समितीला होता.मात्र तसे न होता १८ गावे केडीएमसीतून वगळण्यात आली. त्यामुळे आधीपासूनच शिवसेनेवर नाराज असलेल्या संघर्ष समितीने पुन्हा एकदा शिवसेनेवर नाराजी व्यक्त केली आहे.तर कल्याण ग्रामीणमध्ये महाविकास आघाडी करायची नाही ते संघर्ष समिती ठरवेल असे मत समितीच्या पदाधिकाऱ्यांनी कल्याण ग्रामीण राष्ट्रवादीच्या बैठकीत व्यक्त केले. डोंबिवली पुर्वेकडील मानपाडेश्वर शिवमंदिराच्या आवारात राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या कल्याण ग्रामीणची बैठक संपन्न झाली.


या बैठकीत जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शिंदे,कार्याध्यक्ष डॉ.वंडार पाटील,गुलाब वझे,दत्तात्रय वझे,भगवान पाटील,गजानन मांगुळकर, महिला अध्यक्षा उज्ज्वला भोसले,अॅड.विनया पाटील, रंगनाथ ठाकूर आदिसह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.या बैठकीत राष्ट्रवादीचे पदाधिकारी जरी उपस्थित असले तरी त्यातील अनेक जन संघर्ष समितिचे पदाधिकारी आहेत. त्यामुळे या बैठकीत पदाधिकार्यांनी २७ गावाबाबत आपली मते व्यक्त केली. यावेळी कार्याध्यक्ष डॉ.वंडार पाटील यांनी आपल्या भाषणात पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर नाराजी व्यक्त केली. गावातील अनेकांना एकनाथ शिंदे हे केडीएमसीत गावे आल्यास पाणी देऊ असे उत्तर दिल्याचे जाहीरपणे सांगितले.तर भगवान पाटील म्हणाले, यापूर्वीच्या फडणवीस सरकारमध्ये २७ गावाला दिलेले आश्वासन पूर्ण केले नाही. 


आता महाविकास आघाडीवर संघर्ष समितीने भोळेपणाने विश्वास ठेवला मात्र त्यांनीही फक्त ९ गावे पालिकेत ठेवली. त्यामुळे तर कल्याण ग्रामीणमध्ये महाविकास आघाडी करायची नाही ते संघर्ष समिती ठरवेल असा सांगितले.जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी एेकूण घेतले. ते पुढे म्हणाले, गावातील नागरिकांचे आम्ही एेकूण नक्की सोडवू.राष्ट्रवादीच्या समोर आता आगामी केडी निवडणुकी आहे आता पक्ष संघटना मजबूत करायची असून ज्यांनि कामे केली आहेत त्यांना पडे दिली जाईल. कल्याण ग्रामीण भागात विधानसभा कार्यालय हवे.तर गुलाब वझे म्हणाले,पक्षासाठी मआम्ही नेहमी काम करत असतो.त्यामुळे पक्षाने निरीक्षक ठाण्यातील नाही तर जिल्ह्यातील असावा अशी मागणी केली. अॅड.विनया पाटील म्हणाल्या, आजही राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षात हाडाचे कार्यकर्ते आहेत.पक्षाने सर्वाना संधी पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे.

कल्याण ग्रामीण राष्ट्रवादीच्या बैठकीत शिवसेनेवर नाराजी कल्याण ग्रामीण राष्ट्रवादीच्या बैठकीत शिवसेनेवर नाराजी Reviewed by News1 Marathi on December 06, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

दृष्टीहीनांना चेहरा दाखविणारी दिव्यदृष्टी

  ■यतः सत्यं यतो धर्मो यतो ह्रीरार्जवं यतः।  ततोभवति गोविन्दो यतः कृष्ण्स्ततो जयः अर्थात, जिथे सत्य, धार्मिकता, ईश्वरविरोधी कार्यात अंतःकरणा...

Post AD

home ads